मुंबई : एकीकडे 'पद्मावती'ला वाढता विरोध असल्याने चित्रपटाचे रिलीज पुढे ढकलण्यात आले आहे.
बॉलिवूडचे अनेक स्टार्स चित्रपटाच्या पाठीशी उभे आहेत. अशातच ताण थोडा हलका करण्यासाठी रणवीर सिंग रेस ३ च्या सेटवर पोहचला आहे. रेस 3 च्या कलाकारांसोबत रणवीर सिंगने केलेली धमालमस्ती रमेश तोरानींनी सोशल मीडियामध्ये शेअर केली आहे.
रेस या चित्रपटाचा तिसरा सिक्वेल रेमो डिसुझा दिग्दर्शित करत आहे. या चित्रपटामध्ये सलमान खान महत्त्वाची भूमिका साकारत आहे. सोबतच जॅकलीन फर्नांडिस, बॉबी देओल आणि डेसी शाह या चित्रपटामध्ये झळकणार आहेत.
अभिनेता रणवीर सिंग आणि सलमान खान यांचा रेस 3 च्या सेटवरील खास फोटो ट्विटरच्या माध्यमातून शेअर केला आहे. 'टीप्स फिल्म्स अॅन्ड म्युझिक' या ट्विटर हॅन्डलवरून शेअर करण्यात आलेल्या फोटोला एक कलाकारच दुसर्या कलाकाराचे दु:ख समजू शकतो अशा आशयाचे कॅप्शन दिले आहे.
“Ek Actor hi dusre Actor ka stress samaj sakta hai” - @RanveerOfficial with @BeingSalmanKhan on the sets of #Race3! @remodsouza @RameshTaurani #Eid2018 #FriendsOfRace
@Asli_Jacqueline @thedeol @Saqibsaleem @ShahDaisy25 @Freddydaruwala pic.twitter.com/qsL1LZN8Pd— Tips Films & Music (@tipsofficial) November 20, 2017
प्रत्येकवर्षी ईदच्या मुहूर्तावर सलमान खानचा चित्रपट हमखास रिलीज होतो. पुढील वर्षीच्या ईदला सलमान खानचा ' रेस' हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येईल. पण तेव्हाच ऐश्वर्या राय बच्च्चनचा 'फन्ने खान' येत असल्याचे काही मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे.