रानू मंडल सध्या काय करते...

देवाची दैवी देणगी असलेल्या रानू मंडल 

Updated: Oct 20, 2019, 01:07 PM IST
रानू मंडल सध्या काय करते...  title=

मुंबई : पश्चिम बंगालच्या रानाघाट रेल्वे स्थनकाबाहेर गाणं गाणाऱ्या रानू मंडल यांच्या आयुष्याला चांगलीच कलाटनी मिळाली आहे. 'एक प्यार का नगमा है' गाण्याने त्यांना एक वेगळी ओळख दिली. इन्टरनेट सेंसेशन ठरलेल्या रानू आता प्रसिद्ध गायकांच्या यादीत सामाविष्ट झाल्या आहेत. पण गेल्या कही दिवसापासून त्या कोठे आहेत? काय करतात? याबद्दल काही माहिती नाही. 

सध्या त्या त्यांच्या आगामी बायोपिकच्या कामात व्यस्त आहे. नुकताच त्यांनी स्वत: फेसबुक अकाउंट जारी केलं आहे. फेसबूकवर त्या नेहमी त्यांच्या आयुष्यातील चालू घडामोडी शेअर करतात. रानूंच्या प्रवासाची कथा दिग्दर्शक ऋषिकेश मंडल बायोपिकच्या माध्यमातून जगा समोर आणणार आहेत. 

रानूंच्या बायोपिकमधील काही भाग त्यांच्या गावी शूट करण्यात येणार आणि काही भाग मुंबईत शूट करण्यात येणार आहे. रानूंच्या बायोपिक मध्ये दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतली प्रसिद्ध अभिनेत्री सुदिप्ता चक्रवर्ती मुख्य भूमिका साकारणार आहे.

चित्रपटाची निर्मिती शुभोजित मंडल करणार आहेत. पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात रानू मंडल यांच्या आयुष्याचा प्रवास रूपेरी पडद्यावर प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.