'कभी खुशी कभी गम'मध्ये अभिषेक बच्चनने साकारलेली भूमिका, करीनासोबतचा 'तो' सीन करावा लागला डिलीट

Kabhi Khushi Kabhie Gham Deleted Scenes: कभी खुशी कभी गम चित्रपटात अभिषेक बच्चनने देखील छोटीशी भूमिका साकारली होती. मात्र, नंतर तो सीन डिलीट करण्यात आला. 

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 19, 2023, 05:06 PM IST
'कभी खुशी कभी गम'मध्ये अभिषेक बच्चनने साकारलेली भूमिका, करीनासोबतचा 'तो' सीन करावा लागला डिलीट title=
watch Abhishek Bachchan Scene Was Deleted From Kabhi Khushi Kabhie Gham

Kabhi Khushi Kabhie Gham Deleted Scenes: करण जोहरचा कभी खुशी कभी गम चित्रपटाला 23 वर्ष झाली. पण अजूनही आवडीने हा चित्रपट पाहिला जातो. चित्रपटाची कथा, गाणी, कलाकारांचा अभिनय यामुळं आजही प्रेक्षक मनापासून पाहतात. भारतातील प्रत्येक नागरिकाने आत्तापर्यंत अनेकदा हा चित्रपट पाहिला असेल. मात्र, आता आम्ही तुम्हाला चित्रपटातील असा एक सीन सांगणार आहोत तो चित्रीत तर करण्यात आला  मात्र तो चित्रपटात दाखवण्यात आला नाही.

चित्रपटातून काढून टाकण्यात आलेल्या सीनमध्ये ऋतीक रोशन, करीना कपूर, काजोल आणि शाहरुख खान आहेत. विशेष म्हणजे यात अभिनेता अभिषेक बच्चनने देखील पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे. सध्या सोशल मीडियावर चित्रपटातील हा सीन व्हायरल होत आहे. अभिषेक बच्चन फक्त 2 सेकंदासाठीच हा सीनमध्ये दिसत आहे. 

चित्रपटातून हा सीन का डिलीट करण्यात आला हे मात्र कोडच आहे. काहींच्या मते, चित्रपट खूप मोठा झाला असता म्हणून सीन डिलीट करण्यात आला. चित्रपटातून जो सीन डिलीट करण्यात आला त्यात ऋतीक रोशन आणि करीना कपूर कॉलेजच्या प्रॉम पार्टीला जाण्यासाठी पार्टनर शोधत आहेत. ऋतीक रोशन आणि करीना बोलत असतानाच मध्येच ऋतीक निघून जातो आणि त्यानंतर अभिषेक बच्चन करीनाजवळ येतो. 

अभिषेक बच्चनला करीना म्हणते की, मला तुझ्यासोबत प्रोमला यायचं नाहीये. त्यावर अभिषेक म्हणतो की मला तरी तुझ्यासोबत कुठे जायचंय मी तर वेळ विचारायला आलो होतो, असा हा सीन आहे. अभिषेक बच्चन असलेला हा सीनच चित्रपटातून डिलीट करण्यात आला आहे. तर, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होताच वेगवेगळ्या चर्चा मात्र रंगल्या आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priya (@bollywoodtriviapc)

सोशल मीडियावर या व्हिडिओवर युजर्सकडून वेगवेगळ्या कमेंट येत आहेत. चित्रपटातून हा सीन का डिलीट करण्यात आला याबाबत युजर्स तर्क-वितर्क लढवत आहेत. एका युजरने म्हटलं आहे की, ऋतिकच्या उजव्या गालावर थप्पड मारली होती. मात्र, त्याने डाव्या गालाला हात लावला त्यामुळंच हा सीन डिलीट करण्यात आला असावा. तर अन्य एका युजरने म्हटलं आहे की, हा सीन खूपच मजेशीर आहे. हा चित्रपटात असता तर खूपच मजा आली असती. 

कुभी खुशी कभी गम हा चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला होता. काजोलचा कॉमिक टायमिंग कमालचा होता. शाहरुख आणि काजोलची जोडीही प्रेक्षकांना खूप आवडली होती. त्याचबरोबर, अमिताभ बच्चन, जया बच्चन, करीना कपूर, ऋतीक रोशन मुख्य भुमिकेत होते.