Ranbir Kapoor Ex-Girlfriends Gifts Reveled : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम म्हणून ‘द कपिल शर्मा शो’ला ओळखले जाते. सुप्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा आपल्या विनोदी शैलीने हजारो प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवताना दिसतो. या कार्यक्रमाचा चाहता वर्ग फार मोठा आहे. येत्या 30 मार्चपासून हा विनोदी कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नेटफ्लिक्स ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा कार्यक्रम पाहता येणार आहे. सध्या या कार्यक्रमाच्या एका प्रोमोने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो' या कार्यक्रमातील पहिल्याच भागात अभिनेता रणबीर कपूर, नीतू कपूर आणि त्याची बहिण रिद्धीमा कपूर यांनी हजेरी लावली. नुकतंच या कार्यक्रमाचा पहिला प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोत संपूर्ण कपूर कुटुंब हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे करताना पाहायला मिळत आहे. यावेळी अभिनेता रणबीर कपूरने त्याच्या एक्स गर्लफ्रेंडबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. त्यामुळे सर्वजण थक्क झाले आहेत.
या प्रोमोत कपिल शर्मा हा रणबीर कपूरची बहिण रिद्धीमाला एक मजेशीर प्रश्न विचारतो. “मी असं ऐकलंय की, रणबीर कपूर त्याच्या गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी रिद्धीमा कपूरचे कपडे गिफ्ट म्हणून द्यायचा…” यावर रणबीरने हटके पद्धतीने उत्तर दिले. “अरे कपडेच काय, मी तर माझ्या आईचे (नीतू कपूर) दागिने पण गिफ्ट म्हणून दिले आहेत.” असे रणबीरने यावेळी म्हटले. रणबीरचे हे उत्तर ऐकल्यानंतर प्रेक्षकांनाही धक्का बसला.
रणबीरसह या कार्यक्रमात रिद्धीमा आणि नितू कपूरनेही अनेक खुलासे केले. यावेळी त्यांनी राहाच्या काही सवयीही सांगितल्या. तसेच मला राहाला या कार्यक्रमात आणायचे आहे, असेही रणबीरने यावेळी सांगितले. सध्या या कार्यक्रमाचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दरम्यान रणबीर कपूर हा गेल्या काही महिन्यांपासून अॅनिमल या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटानंतर आता लवकरच तो निर्माते व दिग्दर्शक संजय लीला भन्साळींच्या ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटात झळकणार आहे. यात रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. हा चित्रपट 2025 मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे बोललं जात आहे.