प्रत्यक्ष आयुष्यातील राजकुमारी, अभिनेत्री अदिती राव हैदरी- अभिनेता सिद्धार्थ यांचं शुभमंगल!

Aditi Rao Hydari-Siddharth Married : अदिती राव हैदरीनं गुपचूप केलं सिद्धार्थशी लग्न... प्रत्यक्ष आयुष्यातील राजकुमारी आता झाली सिद्धार्थची राणी...

दिक्षा पाटील | Updated: Mar 27, 2024, 03:57 PM IST
प्रत्यक्ष आयुष्यातील राजकुमारी, अभिनेत्री अदिती राव हैदरी- अभिनेता सिद्धार्थ यांचं शुभमंगल! title=
(Photo Credit : Social Media)

Aditi Rao Hydari-Siddharth Married : नुकतीच बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूनं गुपचुप लग्न केल्याची चर्चा सुरु झाली होती. त्यानंतर आता अशी चर्चा सुरु आहे की बॉलिवूड अभिनेत्री अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थनं देखील गुपचुप लग्न केलं आहे. रिपोर्ट्सनुसार, दोघांनी श्री रंगानायकस्वामी मंदिराच लग्न केलं आहे. आता चाहत्यांना त्या दोघांच्या लग्नाच्या फोटोंची प्रतिक्षा आहे. 

खरंतर अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ हे बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये होते. अनेकदा त्या दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. ग्रेट आंध्राच्या रिपोर्ट्सनुसार, त्या दोघांनी आज 27 मार्च रोजी तेलंगनामधील मंदिरात गुपचुप लग्न केलं आहे. आज संध्याकाळपर्यंत ते दोघे सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करत लग्नाची ऑफिशियल अनाउंसमेंट करु शकतात. दरम्यान, अदिती किंवा सिद्धार्थ दोघांपैकी कोणीही त्यांच्या नात्याला कन्फर्म केलेलं नाही. त्यामुळे आता त्यांच्या चाहत्यांना फक्त त्यांच्या पोस्टची प्रतिक्षा आहेय. असं देखील म्हटलं जात आहे की त्या दोघांनी गुपचुप लग्न करण्याची घाई केली. असं म्हटलं जातं की त्या दोघांनी अखेर सप्तपदी घेतल्या आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अदिती आणि सिद्धार्थ या दोघांची भेट ही 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या तेलगू, तमिळ चित्रपच 'महा समुद्रम' चित्रपटा दरम्यान, झाली होती. त्यांनी या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. अदिती आणि सिद्धार्थ हे चित्रपटसृष्टीतील अनेक कार्यक्रमांमध्ये दिसली होती. इतकंच नाही तर दोघे सुट्टीचा आनंद घेण्यासाठी देखील एकत्र प्रवास करताना स्पॉट झाले आहेत. त्याशिवाय दोघं सोशल मीडियावर अनेक रिल्समध्ये देखील एकत्र दिसतात. त्या दोघांना त्यांच्या चाहत्यांकडून सतत प्रेम मिळालं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अदितीविषयी बोलायचे झाले तर ती एक राजकुमारी आहे. अदितीच्या आईचे वडील जे. रामेश्वर राव हे वानापथीचे राजा होते आणि हैदराबादच्या निजामच्या शाही दरबारातील रईस होते.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अदिती आणि सिद्धार्थच्या प्रोफेशन्ल लाइफ विषयी बोलायचे झाले तर अदिती सगळ्यात शेवटी सिनामिरामध्ये दिसली होती. हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता. आता ती लवकरच हीरामंडी या दिसणार आहे. लवकरच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारखेची घोषणा करण्यात येणार आहे. तर याशिवाय ती लायनेसमध्ये देखील दिसणार आहे. हा एक इंग्रजी चित्रपट आहे. तर सिद्धार्थविषयी बोलायचे झाले तर  तो सगळ्यात शेवटी चिट्ठामध्ये दिसला होता. हा चित्रपट चांगला हिट झाला. आता तो 'इंडियन 2' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात कमल हासन महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.