रणबीर कपूरला त्या एका 'न्यूड सीन' साठी द्यावे लागले 70 टेक

रणबीरला 'न्यूड सीन' साठी प्रयत्न करावे लागले, पण त्याची मेहनत अखेर रंगली  

Updated: Nov 10, 2021, 10:27 AM IST
रणबीर कपूरला त्या एका  'न्यूड सीन' साठी द्यावे  लागले 70 टेक title=

मुंबई : बॉलिवूडचा हॅडसम हंक अभिनेता रणबीर कपूरने 2007 साली 'सांवरिया' चित्रपटाच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण केलं. इंडस्ट्रीमध्ये येताचं रणबीरने त्याच्या स्माईल आणि लूकने सर्व मुलींना घायाळ केलं. आज रणबीर बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी आहे. 'सांवरिया' बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला पण रणबीरच्या करियरला नवी दिशा चित्रपटामुळे मिळाली असं म्हणायला हरकत नाही. रणबीरने त्याच्या पहिल्या चित्रपटातील अभिनयाने  सर्वांच्या मनात घर केलं. त्यानंतर त्याने कधी मागे वळून पाहिलं नाही. 

पहिल्याचं चित्रपटात त्याने न्यूड सीन दिला. तेव्हा तो सीन तुफान चर्चेत देखील आला. 'सांवरिया' चित्रपटातील 'जबसे तेरे नैना' गाण्यात न्यूड सीन दिला. गाण्यात रणबीरने टॉवेलवर डान्स केला.  रणबीरचा न्यूड सीन तुफान व्हायरल झाला. तेव्हा दिग्दर्शक संजय लिला भंसाळींनी या सीनसाठी रणबीरला 70 टेक द्यायला लावले. त्यानंतर अखेर रणबीरचा पहिला न्यूड सीन रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला. 

After 3 flops, what lies ahead for Ranbir Kapoor? | Movies News | Zee News

आज 'सांवरिया' चित्रपटाला 14 वर्षे पूर्ण झाली आहेत. रणबीरने 70 टेक दिल्यानंतर टॉवेल सीन पूर्ण केला. त्यावेळी रणबीरला खूप प्रयत्न करावे लागले होते, पण त्याची मेहनतही रंगली. रणबीर कपूरचे हे गाणे येताच हिट झाले. त्याचा टॉवेल डान्स आजही लोकांच्या मनात आहे. 'सांवरिया'च्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आलेल्या रणबीरचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडण्यात आलं. 

आता रणबीर अभिनेत्री आलिया भट्टला डेट करत आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. नुकतीच बातमी आली होती की, हे कपल याच वर्षी डिसेंबरमध्ये लग्नबंधनात अडकणार आहे. पण आता त्यांचं लग्न २०२२ पर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.