Deepika self-care brand launch : दीपिका पदुकोण सध्या यशाची शिखरे गाठताना दिसत आहे. तिनं अनेक सूपरहिट चित्रपटांत काम केलं आहे. तिनं तिच्या दमदार अभिनयाने चाहत्यांची मनं जिकंली आहेत. तिला अनेक दिग्गज पुरस्कारांनी सन्मानित ही केलं आहे. ती अनेकदा काही कारणांमुळे चर्चेत ही असते. कतरिनाच्या पावलावर पाऊल ठेवत रणवीर सिंगच्या पत्नीने काहीतरी नवीन करायला सुरुवात केली आहे. रणबीर कपूरची माजी मैत्रीण दीपिका पदुकोण तिच्या दुसऱ्या माजी कतरिना कैफकडून पैसे कमवण्याचे नवीन मार्ग शिकत असल्याचे दिसते.
तिनं सोशल मीडियावर आपल्या नव्या निर्णयाची माहिती एका व्हिडीओच्या माध्यमातून दिली असून चाहते हे जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहेत. दीपिका चित्रपटांव्यतिरिक्त काय करणार आहे, चाहते का उत्सुक आहेत आणि कतरिनाला तिच्या हालचालींशी का जोडले जात आहे. आपण हे सगळं इथे जाणून घेणार आहोत...(Ranbir Kapoor Ex Girlfriend Deepika Padukone and Katrina Kaif compete Know what is the real case nz)
दीपिका पदुकोणने 82°E नावाचा नवीन सेल्फ-केअर ब्रँड सुरू केला आहे. दीपिका म्हणते की ती या ब्रँडवर दोन वर्षांपासून काम करत आहे आणि त्याचा जन्म भारतातच झाला आहे. अॅट टू ईस्ट (82°E) च्या माध्यमातून दीपिकाचे उद्दिष्ट लोकांच्या जीवनात स्वत:ची काळजी घेण्याची सवय म्हणून ओळख करून देण्याचे आहे.
दीपिकाच्या या सेल्फ-केअर ब्रँड लॉंचमुळे सर्वांना कतरिना कैफची आठवण येत आहे कारण काही काळापूर्वी कतरिनानेही स्वतःचा ब्युटी ब्रँड सुरू केला होता, ज्याचे नाव 'के बाय कतरिना' आहे. आता दीपिकानेही अशीच काहीशी सुरुवात केली आहे, तेव्हा सर्वांनाच कतरिनाची आठवण येत आहे. आता कतरिना आणि दीपिकाच्या ब्रँड्समध्ये स्पर्धा होणार का हे पाहायचे आहे. दीपिका एक दिवसापूर्वीपासून या ब्रँडला टीज करताना दिसत होती आणि आज तिने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.