Ranbir आणि Katrina ला 'या' अवस्थेत पाहून Salman Khan नं केलं होतं खळबळजनक वक्तव्य

Ranbir Kapoor आणि Katrina Kaif चा हा प्रायव्हेट फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्यावर नेटकऱ्यांपासून सगळ्यांनी विविध कमेंट दिल्या होत्या. 

Updated: Jan 26, 2023, 06:51 PM IST
Ranbir आणि Katrina ला 'या' अवस्थेत पाहून Salman Khan नं केलं होतं खळबळजनक वक्तव्य title=

Ranbir Kapoor And Katrina Kaif Private Photo : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या अफेअरविषयी तर सगळ्यांनाच माहित आहे. रणबीर आणि कतरिना आज त्यांच्या त्यांच्या आयुष्यात आनंदी आहेत. 'अजब प्रेम की गज़ब कहानी', 'राजनीती' आणि 'जग्गा जासूस'  या चित्रपटांमध्ये ते दोघेही दिसले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार रणबीर आणि कतरिना हे चांगले मित्र झाले. मग काय ते सतत कोठे ना कोठे भेटू लागले आणि त्यांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या. अस म्हणतात की त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. रणबीर आणि कतरिना जवळपास 6 वर्षे रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जाते. त्या दरम्यान, त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता आणि इतकंच नाही तर त्यावर तिचा एक्स बॉयफ्रेंड आणि बॉलिवूडचा भाईजान सलमान खाननं (Salman Khan) देखील त्याची प्रतिक्रिया दिली होती. 

रणबीर आणि कतरिनाचा व्हायरल झालेला हा फोटो स्पेन येथील होता. तेथे रणबीर आणि कतरिना त्यांच्या सुट्टीता आनंद घेण्यासाठी पोहोचले होते. या व्हेकेशन दरम्यान, त्या दोघांचे काही खासगी फोटो सोशल मीडियावर लीक झाले होते. या फोटोमध्ये रणबीर हा शर्टलेस असल्याचे दिसते. तर त्यानं हिरव्या रंगाची थ्रीफोर्थ परिधान केली आहे. तर दुसरीकडे कतरिनानं पांढऱ्या आणि नारंगी रंगाची बिकीनी परिधान केली आहे. 

Ranbir Kapoor And Katrina Kaif Private Photo viral salman khan had this reaction

या व्हायरल झालेल्या फोटोवर कतरिनानं देखील तिची प्रतिक्रिया दिली होती. 'पुढच्या वेळी जेव्हा मी सुट्टीवर जाईन आणि तुम्ही फोटो काढण्याचा विचार कराल, तर मला थोडे आधी कळवा मग मी मॅचिंग कपडे परिधान करून येईल. इतकंच नाही तर यावर सलमान खानची प्रतिक्रिया देखील आली होती. 

हेही वाचा : Pathaan Boxoffice Collection Day 1 : 'पठाण' चित्रपटानं इतक्या तासात केला 100 कोटींचा आकडा पार

कतरिना आणि रणबीरच्या या व्हायरल झालेल्या फोटोवर सलमान म्हणाला होता की, 'तुमच्या आईचा, बहिणीचा किंवा मैत्रिणीचा असा फोटो लीक झाला तर तुम्हाला कसं वाटेल?' रणबीर कपूर कतरिना कैफसोबत रिलेशनशिपमध्ये होता. त्याआधी कतरिना ही अभिनेता सलमान खानसोबत रिलेशनशिपमध्ये होती. दरम्यान, आता रणबीरनं आलियाशी लग्न केलं असून त्यांना एक मुलगी आहे. त्यांच्या मुलीचं नाव राहा असे आहे. तर कतरिना कैफनं अभिनेता विकी कौशली लग्न केलं आहे.