अभिनेत्री रवीना टंडनच्या चाहत्यांसाठी अनंदाची बातमी; पद्मश्री पुरस्कारासाठी निवड

४८ वर्षीय रवीना टंडन तिच्या सौंदर्य आणि अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. वयाच्या 17 व्या वर्षी तिने तिच्या करिअरला सुरुवात केली. 

Updated: Jan 26, 2023, 05:40 PM IST
अभिनेत्री रवीना टंडनच्या चाहत्यांसाठी अनंदाची बातमी; पद्मश्री पुरस्कारासाठी निवड title=

मुंबई : रवीना टंडनची ७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पद्मश्री पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. अभिनेत्री रवीना टंडनला तिच्या चमकदार अभिनयासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. रवीना टंडनसाठी हा मोठा सन्मान आहे. तिच्या चित्रपट कारकिर्दीमुळे आणि दमदार अभिनयामुळे तिला हा पुरस्कार देण्यात येत आहे. या बातमीने रवीना खूप खूश आहे.

खरंतर, जेव्हा रवीनाला एका कॉलवर तिला पद्मश्री पुरस्कार मिळाल्याचं सांगण्यात आलं, तेव्हा तिची पहिली प्रतिक्रिया होती, 'काय, मला पद्मश्री मिळाला?'. रवीनाला सुरुवातीला विश्वास बसला नाही, पण नंतर तिने एका मुलाखतीत तिच्या कारकिर्दीबद्दल आणि आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल सांगितलं आणि याबद्दल तिचे मनापासून आभार मानले.

जेव्हापासून तिच्या जवळच्या व्यक्तींना ही गोष्ट कळाली तेव्हापासून रवीनावर कौतूकाचा वर्षाव होत आहे. रवीना या पुरस्काराबद्दल काय म्हणाली? पुरस्काराबाबत रवीना म्हणाली, ''मी काय बोलू? मला खूप सन्मान आणि कृतज्ञ वाटतंय. खरंतर हे सर्व लोकांच्या प्रेमामुळेच घडलं आहे. मी बराच काळ इंडस्ट्रीचा एक भाग आहे आणि प्रत्येकाने मला चांगलं काम करण्याची संधी दिली आहे. मला या सन्मानाची अजिबात अपेक्षा नव्हती. यावर काय प्रतिक्रिया द्यावी हेच मला समजत नाही.''

रवीना टंडनची कारकीर्द
४८ वर्षीय रवीना टंडन तिच्या सौंदर्य आणि अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. वयाच्या 17 व्या वर्षी तिने तिच्या करिअरला सुरुवात केली. तेव्हापासून आजपर्यंत तिने चित्रपटसृष्टीला अनेक उत्तमोत्तम चित्रपट दिले आहेत. ज्यामध्ये तिच्या कामाचं खूप कौतुक झालं.

तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर तिने आपल्या करिअरची सुरुवात अगदी लहान वयात केली होती. आणि 2004 मध्ये आयुष्याचा प्रवास पुढे नेत अनिल थडानीशी लग्न केलं. तिला दोन मुली आहेत. रवीना टंडनने लग्नापूर्वीच 2 मुली दत्तक घेतल्या होत्या. ज्यामध्ये एका मुलीचं लग्न झालं असून ती आजी देखील झाली आहे.