रणबीर-आलियाचा 'हा' सेल्फी सोशल मीडियावर हिट...

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट ही बॉलिवूडची जोडी सध्या जोरदार चर्चेत आहे.

Updated: Aug 24, 2018, 03:41 PM IST
रणबीर-आलियाचा 'हा' सेल्फी सोशल मीडियावर हिट... title=

मुंबई : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट ही बॉलिवूडची जोडी सध्या जोरदार चर्चेत आहे. लवकरच ही जोडी 'ब्रह्मास्त्र' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येईल. सिनेमापेक्षा त्या दोघांच्या अफेअरची अधिक चर्चा होत आहे. काही दिवसांपूर्वी आलियाने आपल्या फ्रेंड्ससोबतचा फोटो शेअर केला. पण त्याचे क्रेडीट रणबीर कपूरला द्यायला ती विसरली नाही. आता आलिया आणि रणबीरचा एका सेल्फीने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. रणबीर-आलियाचा हा सेल्फी त्यांच्या चाहत्यांना सुखावणार आहे. 

माहितीनुसार, हा सेल्फी 'ब्रह्मास्त्र' सिनेमाच्या शूटिंग दरम्यान बुलगेरियात काढलेला आहे. सेल्फीत रणबीरची भली मोठी स्माईल आणि आलियाचा पाऊट पाहण्यासारखा आहे. 

तर तुम्हीही पाहा या लव्हबर्ड्सचा हा खास सेल्फी...

 

Rate-O-Meter Of Cuteness Is Just At Another Level @aliaabhatt #ranbirkapoor

A post shared by Ranbir Kapoor (@rkians_forever) on

ब्रह्मास्त्र सिनेमात आलिया-रणबीरशिवाय अमिताभ बच्चनही प्रमुख भूमिकेत आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन अयान मुखर्जी करत आहे. 

अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत आलियाने रणबीरसोबतच्या लग्नाबद्दल बोलताना सांगितले की, "मी अफवांवर लक्ष देत नाही. अफवा काही बोलण्यासाठी किंवा उत्तर देण्यासाठी नसतात. पुढे ती म्हणाली की, जोपर्यंत तुम्ही माझ्या बाथरुममध्ये घुसत नाही तोपर्यंत ठीक आहे. जर तुम्ही माझ्याबद्दल बोलत नाही याचा अर्थ मी लोकप्रिय नाही. खरं सांगायचं तर मी माझ्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यातही खूप खूश आहे." तर लग्नाबद्दल रणबीर म्हणतो की...