गुरूनाथ घरी आल्यावर राधिकेच्या अडचणीत वाढ होणार का?

काय करणार राधिका 

मुंबई : माझ्या नवऱ्याची बायको या झी मराठीच्या लोकप्रिय मालिकेच्या कालच्या एपिसोडची सुरुवात गुरु आणि केड्यापासून झाली. गुरूच्या सांगण्यावरून केड्या गुरुला बेधम मारतो. काही वेळाने आई आली नाही म्हणून गुरु सरीताला फोन करतो. तेव्हा ती म्हणते मी येतच होते तेवढ्यात समिधाला त्रास सुरु झाल्याने मी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन आली आहे. थोड्या वेळाने पंकज आला की मी लगेचच येते. दरम्यान शनाया गुरूला फोन करून कुठे आहेस ते विचारते. पण तिचा फोन केड्या उचलतो तेव्हा शनाया रागावून म्हणते की, गुरूचा फोन तुझ्याकडे का आहे? मग गुरु केड्याला म्हणतो तिला नंतर भेटतो असे सांग पण शनाया ऐकायला तैयार नसते, दरम्यान बोलता बोलता उपवनातील गणपती मंदिरात आहोत असे केड्या तिला सांगून टाकतो. ते ऐकून गुरु केड्याला म्हणतो तिला कशाला सांगितलेस आणि ती इथे असताना आई आली की प्रॉब्लेम नाही का होणार.

तिकडे फोन ठेवल्यावर गुरु आणि केड्या मंदिराकडे कशाला गेले असतील याचा विचार करत असलेली शनाया त्यांना भेटायला जाण्यासाठी रिक्षा पकडते. दुसरीकडे महाजनी काका आणि श्री सुभेदार समिधाच्या काळजीत पडलेले असतात एवढ्यात राधिका त्यांना राधिका फोन करून सांगते समिधाला मुलगी झाली. ते ऐकून श्री सुभेदार आणि महाजनी फार खुश होतात. पुढे राधिका म्हणते हॉस्पिटल मधून आई निघाल्या आहेत त्यामुळे आता तुम्ही घरातून बाहेर कुठेही जाऊ नका. तिकडे गुरूला भेटायला गेलेली सरीता गुरुला मार लागलेले पाहून हादरून जाते आणि गुरूला काय झाले असे विचारते. आजवर ज्यांचे ज्यांचे पैसे घेतले होते त्यांच्यापासून लपत फिरत होतो पण आज एकाने पकडले आणि मला बेधम मारले. ते ऐकून सरीता मारणाऱ्याला भले बरे बोलून चांगलेच सुनावते. दरम्यान गुरु चांगलेच मीठ मसाला लावून आईला आपल्या वाईट दिवसांची कथा सांगत असतो आणि मध्येच समोर असलेल्या तलावात आता मी जीव देतो असे सांगून तलावाच्या कठड्यावर उभा राहतो पण सरीता त्याचा हात पकडून थांबवत असते. एवढ्यात तिथे शनाया येते आणि गुरु जीव देतो आहे हे पाहून धावत जाऊन गुरूला कठाड्यावरून खाली उतरवते आणि म्हणते, नको ना जीव देऊ, एवढ्या गोष्टीसाठी कशाला जीवानिशी जातोस, जाऊदे आपण शॉपिंगला जायचे कॅन्सल करून पण तू असे जीवननिशी जाऊ नकोस. हे ऐकून सरीता कसले शॉपिंग असे गुरूला विचारते. तेव्हा शनाया म्हणते आज आम्ही शॉपिंगला जाणार होतो. त्यावेळी गुरु पुन्हा नाटक करीत शनायावर आरोप करते. मग सरीता गुरूला घेऊन घरी जाते आणि शनाया मात्र तिथेच राहते. ती दोघे गेल्यावर शनाया गुरुवार फार चिडते पण, केड्या तिला समजावून त्याच्या सोबत घेऊन जातो.

दरम्यान तिकडे आनंद आणि सौमित्र समिधाला झालेल्या मुलीबद्दल खुश होऊन कॉफी पित चर्चा करीत असतात. तेव्हा आनंदाच्या लक्षात येते की श्रेयस, जेनी आणि पानवलकरांना समिधाला मुलगी झाल्याचे अजून ठाऊक नाही म्हणून तो फोन करून त्यांना देण्यासाठी फोन काढायला जातो पण नंतर सौमित्राला म्हणतो असं फोन करून सांगण्यापेक्षा प्रत्यक्षात जाऊनच सांगूया. तिकडे श्री सुभेदार सरीताच्या काळजीत पडलेले असतात राधिका घरी येते. मग दोघांचीही समिधा आणि तिच्या मुलीबद्दची चर्चा होते दरम्यान आई तिकडे आल्या म्हणून फार बरे झाले असे राधिका म्हणते आणि कुठे आहेत आई असे विचारते. तेव्हा श्री सुभेदार म्हणतात अजून आली नाही ती. दोघंही सारीताच्या काळजीने व्याकुळ होतात. एवढ्यात सरीता गुरूला घेऊन दारात उभी ठाकते. श्री सुभेदार आणि राधिका गुरुला घरात प्रवेश देतील का हे बघण्यासाठी माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेचा उद्याचा एपिसोड बघायला विसरून नका .