लग्नानंतर आलिया - रणबीरच्या रिसेप्शनचे Inside फोटो बहिणीकडून शेअर

पाहा आलिया आणि रणबीरच्या रिसेप्शनचे फोटो... सोशल मीडियावर तुफान चर्चा  

Updated: Apr 17, 2022, 09:43 AM IST
लग्नानंतर आलिया - रणबीरच्या रिसेप्शनचे  Inside फोटो बहिणीकडून शेअर title=

मुंबई : अखेर तो दिवस आलाचं... अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेते रणबीर कपूर यांचं लग्न झालं.  सध्या सर्वत्र त्यांच्या लग्नाची चर्चा रंगत असताना त्याच्या रिसेप्शनचे फोटो पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. गेल्या काही दिवसांपासून फक्त आणि फक्त रणबीर आणि आलियाच्या लग्नाची चर्चा आहे. त्यांच्या रिसेप्शन पार्टीमधील काही फोटो तुफान व्हायरल होत आहे. 

Alia Alia Alia Alia

आलिया आणि रणबीरच्या रिसेप्शनचे काही फोटो रणबीरची बहिण रिद्धीमा कपूर सहानीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. फोटोमध्ये रणबीरचा लूक समोर आला. पण आलियाचे रिसेप्शनमधील फोटो अद्याप समोर आलेले नाहीत. 

Ranbir Alia Ranbir Alia Ranbir Alia Ranbir Alia

रिसेप्शन पार्टीत हे स्टार्स पोहोचले
आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या रिसेप्शन पार्टीला करण जोहर, सोनी राजदान, शाहीन भट्ट, अर्जुन कपूर, मलायका अरोरा, तारा सुतारिया, आदित्य सील आणि इतरांसह अनेक दिग्गज उपस्थित होते.

सोशल मीडियावर या स्टार्सचे फोटो व्हायरल झाले आहेत, जे रणबीर आणि आलियाच्या घराबाहेर स्पॉट झाले होते. आता रिसेप्शनमधील आलिया आणि रणबीरचे फोटो कधी समोर याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.