RRR फेम अभिनेत्याच्या नवजात मुलीसाठी चाहत्यांचं सरप्राईज गिफ्ट, अभिनेताही झाला भावूक

Ramcharan Spotted with Wife Upasana and New Born Daughter: आरआरआर चित्रपटातील लोकप्रिय अभिनेता रामचरण हा कायमच चर्चेत असतो. सोबतच त्याच्या अभिनयाचीही अनेकदा चर्चा होताना दिसते. सध्या तो आपली पत्नी आणि नवजात लेकीसोबत स्पॉट झाला आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Jun 23, 2023, 07:57 PM IST
RRR फेम अभिनेत्याच्या नवजात मुलीसाठी चाहत्यांचं सरप्राईज गिफ्ट, अभिनेताही झाला भावूक title=
June 23, 2023 | Ramcharan Spotted with Wife Upasana and New Born Daughter photos goes viral

Ramcharan Spotted with Wife Upasana and New Born Daughter: RRR फेम अभिनेता रामचरण हा आपल्या अभिनयासाठी ओळखला जातो. दाक्षिणात्त्य सिनेसृष्टीत तर त्याचा एक वेगळाच दबदबा आहे. त्याबद्दल अनेकदा लिहिलं आणि बोललं जातं. तुम्हाला माहितीच असेल की रामचरण आणि त्याची पत्नी उपासना यांनी एका गोंडस चिमुरडीला जन्म दिला आहे आणि तिची चर्चाही अनेकदा होताना दिसते. रामचरणनं आपल्या लेकीचा चेहरा अद्याप दाखवलेला नाही. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना त्याच्या लेकीचा चेहरा पाहायची कोण उत्सुकता लागून राहिली आहे. त्यानं इन्टाग्रामवरून आपल्याला मुलगी झाली असल्याची माहिती दिली होती. त्यावरून त्याच्या चाहत्यांमध्ये कोण आनंद पसरला होता. तेव्हा त्याला त्याच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला होता. परंतु आता त्यांच्या चाहत्यांची प्रतीक्षी संपली आहे. नुकतेच उपासना आणि रामचरण त्यांच्या लेकीसह स्पॉट झाले आहेत. 

काही दिवसांपुर्वी रामचरणनं इन्टाग्रामवर एक पोस्ट व्हायरल केली होती ज्यात त्यानं आपल्या लग्नाच्या एन्हीवर्सरीबद्दल एक गोड पोस्ट केली होती. यावेळी त्यांनी आपल्या लग्नाचा 11 वा वाढदिवस साजरा केला होता. राम चरण आणि उपासना कमिनेनी हे लग्नाच्या 11 वर्षांनंतर आईबाबा झाले आहेत. त्यांच्या या गोड बातमी सगळीकडेच आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या कुटुंबियांनाही विशेष आनंद झाला होता. आरआरआर या चित्रपटातीन 'नाटू नाटू' या गाण्याला ऑस्कर पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यावेळी रामचरण आणि उपासनाही ऑस्कर सोहळ्याला उपस्थित होते. रामचरण यांना मुलगी झाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी अक्षरक्ष: फटके फोडले होते. सोबतच मिठाईही वाटली होती आणि ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषही केला होता. 

आरआरआर या चित्रपटातील गायक काला भैरव यांनी राम चरण यांच्या लेकीसाठी खास धूनही तयार केली होती. इतकं प्रेम त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्यावर केले आहे. त्यामुळे त्यांची अनेकदा चर्चा ही होताना दिसते. आता उपासना आणि रामचरण आपल्या लेकीसह स्पॉट झाले आहेत. तेव्हा त्यांचे फोटोही प्रचंड व्हायरल झाले आहे. यावेळी त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्यावर गुलाबांच्या पाकळ्यांची उधळणही केली. तेव्हा त्यांचा हा व्हिडीओही सर्वत्र व्हायरल झाला आहे. उपासनानं 20 जूनला या गोंडस बाळाला जन्म दिला आहे. त्यानंतर चार दिवसांनी तिला डिस्चार्जही मिळाला होता. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

यावेळी चाहते त्यांचे फोटो काढण्यात मग्न झाले आहेत. यावेळी ते दोघं पांढऱ्या आऊटफिटमध्ये दिसत आहेत.