VIDEO : राम मंदिर सोहळ्यात गुपचुप रणबीर कपूरनं काढला कतरिना कैफसोबत फोटो?

Ranbir Kapoor- Katrina Kaif : रणबीर कपूरनं गुपचूप काढला कतरिना कैफसोबत फोटो, सोशल मीडियावरील व्हिडीओमुळे एकच चर्चा

दिक्षा पाटील | Updated: Jan 22, 2024, 04:24 PM IST
VIDEO : राम मंदिर सोहळ्यात गुपचुप रणबीर कपूरनं काढला कतरिना कैफसोबत फोटो?  title=
(Photo Credit : Social Media)

Ranbir Kapoor- Katrina Kaif : अयोध्येच्या राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम अखेर संपन्न झाला आहे. या सगळ्यात सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. याच कार्यक्रमासाठी बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावली होती. त्यातील एका व्हायरल झालेल्या व्हिडीओत सुभाष घई, रणबीर कपूर, कतरिना कैफसोबत अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. यात रणबीर कपूरनं असं काही केलं की त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

अयोध्येत झालेल्या आजच्या कार्यक्रमासाठी लोकं पोहोचले. यात एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यात नेटकरी रणबीर कपूरची खिल्ली उडवड आहेत. खरंतर आलिया ही मुकेश अंबानी यांची मोठी सून श्लोका मेहताशी गप्पा मारत होती. तर दुसरीकडे रणीबर कपूर हा सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. त्यावेळी तो कतरिना कैफचा फोटो काढतोय असं त्या व्हिडीओत दिसतोय. 

पाहा व्हिडीओ 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या व्हिडीओवर सुभाष घई यांनीच रेकॉर्ड केला आहे. या व्हिडीओत त्यांच्या मागच्या सीटवर श्लोका अंबानी बसल्याचे पाहायला मिळते. आलिया श्लोकाशी बोलत असताना रणबीर अचानक त्याच्या मोबाईलवर करत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत होतात. इंट्रेस्टिंग गोष्ट म्हणजे त्याच्या बरोबर मागे कतरिना कैफ तिचा पती विकी कौशलसोबत बसले आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी त्यावर अनेकांनी कमेंट केल्या आहेत की तो कतरिनासोबत फोटो कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतोय. एक नेटकरी म्हणाला, 'रणबीर-कतरिना कैफचा फोटो काढण्याचा प्रयत्न करतोय.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'रणबीरनं कतरिनासोबत गुपचूप फोटो काढण्याचा पूर्ण प्रयत्न केला.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'बॉलिवूडवाले इथे आल्यानंतरही भक्तीच्या जागी गॉसिप करणं सुरु करतात.' एक नेटकरी म्हणाला, 'रणबीर कतरिनसोबत सेल्फी काढतोय.' तर कोणी म्हणालं की 'तो मंदिराचा फोटो काढतोय.'

हेही वाचा : 'कोटी जनांमधून मला निमत्रण यावं...', अभिनेता सुनील बर्वेचें अयोध्येतील फोटो समोर!

दरम्यान, आज अमिताभ बच्चन, आलिया भट्ट, रणबीर कपूर, कतरिना कैफ, विकी कौशल, आयुष्मान खुराना, आकाश अंबानी त्याची पत्नी श्लोका अंबानी,  माधुरी दीक्षित आणि तिचा पती डॉक्टर नेने देखील पोहोचले होते. या कार्यक्रमातील या सेलिब्रिटींचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यांच्याशिवाय अनेक दाक्षिणात्य कलाकारांनी देखील यावेळी हजेरी लावली होती.