Ram Charan Birthday: राम चरणनं वाढदिवसाच्या निमित्तानं चाहत्यांनाच दिलं गिफ्ट, तुम्हीही पाहतच राहाल

Ram Charan next gets title Game Changer : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक सुपरस्टार म्हणजे राम चरण. RRR या चित्रपटामुळे त्याला वेगळी ओळख मिळाली. आज राम चरणचा वाढदिवस असून त्याने चाहत्यांसाठी गोड बातमी घेऊन आला. 

Updated: Mar 27, 2023, 01:32 PM IST
Ram Charan Birthday: राम चरणनं वाढदिवसाच्या निमित्तानं चाहत्यांनाच दिलं गिफ्ट, तुम्हीही पाहतच राहाल title=
Ram Charan next gets title Game Changer

Ram Charan Birthday: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार राम चरण (Ram Charan Birthday) याचा आज वाढदिवस आहे. RRR या चित्रपटामुळे त्याला वेगळी ओळख मिळाली. त्याचा चाहतावर्ग देखील खूप वाढला आहे. आज जगभरात राम चे करोडो फॅन्स आहेत. फक्त सिनेमाच नाही तर विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या राम चरण मोठ्या संपत्तीचा मालक आहे. राम चरणने वाढदिवसानिमित्त चाहत्यांना एक सरप्राईज दिले आहे. दरम्यान दक्षिण चित्रपट उद्योगातील प्रसिद्ध अभिनेते राम चरण (Ram Charan) यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाचे अधिकृत शीर्षक RC15 जाहीर केले आहे. राम चरण यांनी स्वत: ट्विट करत माहिती दिली आहे.  

या मोस्ट अवेटेड चित्रपटाचे शीर्षक गेम चेंजर (Game Changer Movie) असे ठेवण्यात आले आहे. राम चरणने ट्विटरवर चित्रपटाचे अधिकृत पोस्टर जारी करून चाहत्यांना याची माहिती दिली. शंकर यांनी राम चरणच्या गेम चेंजरचे दिग्दर्शन केले असून कियारा अडवाणी (Kiara Advani) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. राम चरण आणि कियारा अडवाणी (Ram Charan and Kiara Advani) व्यतिरिक्त, गेंम चेंजरच्या कलाकारांमध्ये अंजली, समुथिराकणी, एसजे सूर्या, श्रीकांत, सुनील यांचाही समावेश आहे. एस थमन या चित्रपटासाठी गाणी आणि पार्श्वसंगीत तयार करत आहे. 

वाचा: परवानगीशिवाय Ex Girlfriend चा आवाज वापरल्यामुळं लोकप्रिय गायकाला 330 कोटींचा फटका

आरआरआर सुपरहिट 

गेल्या वर्षी राम चरण राजामौली यांचा सुपरहिट चित्रपट ट्रिपल आर (RRR) मध्ये दिसला होता. या चित्रपटाला देशभरात ओळख मिळाली. राम चरण हिंदी प्रेक्षकांमध्येही खूप प्रसिद्ध झाले आहेत. लोक त्याच्या चित्रपटांची वाट पाहत आहेत. राम चरणच्या नवीन चित्रपटाच्या शीर्षकाच्या घोषणेने हिंदी प्रेक्षकही खूश आहेत आणि त्यांचे सतत अभिनंदन करत आहेत. चाहत्यांचे म्हणणे आहे की ते राम चरणचा गेम चेंजर चित्रपटगृहांमध्ये नक्कीच पाहतील.

हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज

  मीडियाला दिलेल्या मुलाखतीत राम चरण म्हणाला की, हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास मी सज्ज आहे. पण याबद्दल बोलण्याची ही वेळ नाही. सध्या यावर काम सुरू असून लवकरच मी याबद्दल घोषणा करेन.