बॉयफ्रेंडसोबत राखी सावंत पोहचली दुबईला; व्हिडिओ व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत गेल्या काही काळापासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.

Updated: May 26, 2022, 08:54 PM IST
बॉयफ्रेंडसोबत राखी सावंत पोहचली दुबईला; व्हिडिओ व्हायरल title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत गेल्या काही काळापासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. सध्या तिच्या आयुष्यात एका नवीन बॉयफ्रेंडने एंट्री घेतली आहे.  राखी सावंतच्या बॉयफ्रेंडचं नाव आदिल हुसैन दुर्रानी आहे. ती अनेकदा मीडियाला आदिलबद्दल सांगत असते. यासोबतच ती अनेकदा त्याच्यासोबतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. आता राखी सावंत पहिल्यांदाच बॉयफ्रेंड आदिलसोबत दुबईला गेली आहे. जिथे दोघंही एकमेकांसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करताना दिसत आहेत.

याची माहिती खुद्द राखी सावंतने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. राखी सावंत सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी अनेकदा खास फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. राखी सावंतने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर बॉयफ्रेंड आदिलसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या कपलच्या दुबई ट्रिपचा हा व्हिडिओ आहे.

व्हिडिओमध्ये राखी सावंत आणि आदिल कारच्या मागील सीटवर बसलेले दिसत आहेत. यावेळी राखी सावंत पिंक आणि ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये दिसली. तर दुसरीकडे आदिल निळ्या रंगाचा शर्ट आणि ट्राऊजरमध्ये दिसत आहे. राखी सावंत कारमधून तिच्या चाहत्यांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये ती म्हणतेय की, 'हाय मी दुबईत आहे. मी साडी नेसली आहे.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 या व्हिडिओवर एका सोशल मीडिया यूजरने कमेंट केली की, 'हा पब्लिसिटीसाठी आला आहे राखी जी... हा पण जाईल सोडून काही दिवसांनी.' तर दुसऱ्या एका चाहत्याने लिहिलं आहे की, 'रितेशपेक्षा चांगला आहे राखी. तर अजून एकाने म्हटलंय की, 'राखी नेहमी आनंदी राहा, फसवू नको, आता लग्न करा.' याशिवाय इतर अनेक सोशल मीडिया यूजर्सनी कमेंट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे.