राखी सावंतने उडवली शर्लिन चोप्रा खिल्ली; Video Viral

राखी सावंत सोशल मीडिया यूजर्सच्या निशाण्यावर आली आहे.

Updated: Oct 31, 2022, 10:28 PM IST
राखी सावंतने उडवली शर्लिन चोप्रा खिल्ली; Video Viral title=

मुंबई : राखी सावंत कॅमेऱ्यासमोर आली, तर समजा विषय सेट झालाच पाहिजे. मग ती काय बोलेल आणि काय करेल हे फक्त देवालाच ठाऊक, पण ती काय बोलते यावर गदारोळ होणं स्वाभाविक आहे. आता राखी सावंत पुन्हा एकदा सक्रिय झाली असून यावेळी कॅमेऱ्यासमोर तिने MeToo आरोपी साजिद खानला निर्दोष म्हणाली आहे, तर ती शर्लिन चोप्राची खिल्ली उडवायला चुकली नाही. त्यामुळे आता राखी सावंत सोशल मीडिया यूजर्सच्या निशाण्यावर आली आहे.

शर्लिन चोप्राची उडवली खिल्ली
अलीकडेच शर्लिनने साजिद खान विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती आणि त्याला लवकरात लवकर बिग बॉसमधून बाहेर काढण्याची मागणी केली होती. परंतु त्याच्यावर कोणतीही कारवाई न केल्यामुळे शर्लिन नुकतीच पोलिस स्टेशनच्या बाहेर आणि मीडियासमोर स्पॉट झाली. एवढंच नव्हे त्याच्यावर कारवाई न होण्या मागचं कारण तिने सलमान खानला सांगताना दिसली. यासोबतच ती कॅमेऱ्यांसमोर रडतानाही दिसली. त्यानंतर आज जेव्हा राखी सावंतला याबाबत विचारण्यात आलं तेव्हा तिने शर्लिन चोप्राची खिल्ली उडवण्याची एरही संधी सोडली नाही. तिच्यासारखा रडण्याचा अभिनयासोबतच राखीने तिच्याबद्दल खूप काही सांगितलं.

साजिद खान निर्दोष असल्याचं सांगितलं
शर्लिनची खिल्ली उडवताना ती साजिद खानला निर्दोष सांगायला चुकली नाही. साजिदला आपला भाऊ म्हणून सांगताना ती म्हणाली की, त्याने काहीही केलेलं नाही म्हणून कोणीही त्याच्या विरोधात आलं नाही. अशा परिस्थितीत शर्लिन विनाकारण त्याच्यामागे पडली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

त्याचवेळी राखी सावंतचा हा व्हिडिओ पाहून आता सोशल मीडिया यूजर्स चांगलेच संतापले आहेत. तिच्या म्हणण्यानुसार, जेव्हा राखी स्वतः असा ड्रामा करते, तेव्हा ती याचा विचार का करत नाही. याशिवाय साजिद खानला सपोर्ट केल्यामुळे लोकं राखीला ट्रोलही करत आहेत.