Rakhi Sawant Marriage : राखी-आदिल यांच्या लग्नाचं सत्य काय? वकिलाने केला 'हा' धक्कादायक खुलासा

Rakhi Sawant Wedding : राखी सावंत च्या विवाहावर वकीलांनी दिली प्रतिक्रिया आदिल विषयी बोलताना केला मोठा खुलासा... राखी सावंतनं सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना तिच्या आयुष्यातील सगळ्यात आनंदाची बातमी दिली होती.  

Updated: Jan 13, 2023, 01:14 PM IST
Rakhi Sawant Marriage : राखी-आदिल यांच्या लग्नाचं सत्य काय? वकिलाने केला 'हा' धक्कादायक खुलासा title=

Rakhi Sawant Marriage : बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंतनं (Rakhi Sawant) काही महिन्यांपूर्वी तिचा आणि रितेशचा (Ritesh) घटस्फोट झाल्याचे सांगितले होते. दरम्यान, राखीनं तिच्या आणि बॉयफ्रेंड आदिलच्या (Adil Khan Durrani) लग्नाचे फोटो शेअर केले होते. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. राखीनं आदिल खान दुर्रानीसोबत मुस्लिम परंपरेनं विवाह केला. राखी हा विवाह लीगल असल्याचे म्हणत आहे आणि तिनं त्याचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहे.  दरम्यान, आदिल खाननं त्याचं आणि राखीचा विवाह झाला नाही असं म्हटलं आहे. त्यावर आता राखी सावंतचा वकील फाल्गुनी ब्रह्मभट्टने तिच्या लग्नाचे सत्य सांगितले आहे.  

राखीचे वकील फाल्गुनी ब्रह्मभट्टनं (Rakhi Sawant Lawyer) टेली मसालाला दिलेल्या मुलाखतीत स्पष्टपणे सांगितले की राखी सावंत आणि आदिल खानचे लग्न खोटं नसून ते खरं आहे. राखी सावंतचे वकिल फाल्गुनी ब्रह्मभट्ट यांनी सांगितलं की, 'दोघांचे आधी लग्न झाले होते आणि नंतर बीएमसीमध्ये लग्नाची नोंदणी करण्यात आली होती. दोघांचे लग्न मे 2022 मध्ये झाले होते.' विवाह इतके दिवस लपवून ठेवण्यावर राखी सावंत म्हणाले, त्यांनी जो निर्णय घेतला तो दोघांचा असेल. त्यामुळे आदिलनं विवाहाला नकार दिला तरी काही फरक पडत नाही, कारण त्यांचा विवाह झाला आहे. त्यांच्या लग्नाचे जे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत ते खोटे असून शकत नाही.' (Rakhi Sawant's Lawyer Talk About Her Marriage) 

Rakhi Sawant चा विवाह कायदेशीर वकील काय म्हणाले? 

राखी सावंतचे वकिला म्हणाले, 'निकाहनामा आल्यानंतर आदिल खान आणि राखी सावंत त्यांच्याकडे आले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आदिलनं स्वत: चा विवाह कायदेशीर करण्यावर अधिक भर दिला होता. आदिलने विवाह खोटं असल्याचं म्हटल्यानं राखी खूप नाराज आहे. '

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुढे राखीच्या वकिलांनी असेही म्हटले की, 'आदिल ज्या प्रकारे या विवाहाला नकार देत आहे, त्यावरून असे दिसते की एकतर तो राखीला स्वत:च्या फायद्यासाठी भेटला आणि आता त्याला प्रसिद्धी मिळाली, म्हणून तो त्यातून बाहेर पडतोय. जेव्हा दोघे लग्नाला कायदेशीर करण्यासाठी आले तेव्हा दोघेही खूप आनंदी होते आणि आदिल असे काही बोलेल असे त्यांना वाटले नव्हते.'

हेही वाचा : Rakhi Sawant Marriage : राखी सावंत गरोदर? आदिलनं लग्नाला नकार देताच मोठा खुलासा

खरं तर, राखीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्रेग्नंसी आणि  सिंगल मदर असण्याबद्दल म्हटले आहे. राखीनं ही मुलाखत नवभारत टाइम्सला दिली होती. यावेळी राखी म्हणाली, ' आदिलसोबत झालेल्या माझ्या विवाहात मी खूप खूश आहे. मला कळत नाही तो का नाकारतोय? त्याच्या नकारानं मला धक्काबसला आहे. आमच्या विवाहाचे सत्य सांगण्यासाठी मी त्याला गेल्या 7 महिन्यांपासून सांगत होते. मी एक सेलिब्रिटी आहे आणि माझ्या आयुष्याशी संबंधीत गोष्टी अशा लपवल्या जाऊ शकत नाहीत. मी प्रेग्नंट राहीन किंवा काहीही झालं.'  

यामुलाखतीत राखी फक्त प्रेग्नंसी विषयी बोलली नाही तर सिंगल पेरेंटिंगविषयी देखील बोलली आहे. राखीनं तिच्या प्रेग्नंसीविषयी अजून काही बोलण्यावर नकार दिला. तर याविषयावर तिला सध्या काही बोलायचे नाही असं म्हटले. राखी म्हणाली, 'लग्नाविषयी सांगणं खूप महत्त्वाचं झालं होतं. हे लोकांसमोर आलं नसतं तर खूप त्रास झाला असता.' राखी पुढे म्हणाली की, ती खूप घाबरली आहे, त्यामुळे तिच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. जर ती सिंगल मदर झाली तरी ती आदिलवर शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम करत राहील.