Rakhi Sawant Marriage : राखी सावंत गरोदर? आदिलनं लग्नाला नकार देताच मोठा खुलासा

Rakhi Sawant नं आदिलनं त्यांच्या लग्नाला नकार देताच हा मोठा खुलासा केला आहे...

Updated: Jan 13, 2023, 12:56 PM IST
Rakhi Sawant Marriage : राखी सावंत गरोदर? आदिलनं लग्नाला नकार देताच मोठा खुलासा title=

Rakhi Sawant talk about pregnancy and Single Mother : बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंतनं (Rakhi Sawant) काही महिन्यांपूर्वी तिचा आणि रितेशचा (Ritesh) घटस्फोट झाल्याचे सांगितले होते. दरम्यान, काल राखीनं तिच्या आणि बॉयफ्रेंड आदिलच्या (Adil Durrani) लग्नाचे फोटो शेअर केले होते. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. राखीनं आदिल खान दुर्रानीसोबत मुस्लिम परंपरेनं विवाह केला. दरम्यान, आदिल खाननं त्याचं आणि राखीचं लग्न झालं नाही असं म्हटलं आहे. आता राखी असं काही बोलून गेली की ती प्रेग्नंट असावी असा अंदाज लोकांनी लावला आहे. 

खरं तर, राखीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्रेग्नंसी आणि  सिंगल मदर असण्याबद्दल म्हटले आहे. राखीनं ही मुलाखत नवभारत टाइम्सला दिली होती. यावेळी राखी म्हणाली, ' आदिलसोबत झालेल्या माझ्या विवाहात मी खूप खूश आहे. मला कळत नाही तो का नाकारतोय? त्याच्या नकारानं मला धक्काबसला आहे. आमच्या विवाहाचे सत्य सांगण्यासाठी मी त्याला गेल्या 7 महिन्यांपासून सांगत होते. मी एक सेलिब्रिटी आहे आणि माझ्या आयुष्याशी संबंधीत गोष्टी अशा लपवल्या जाऊ शकत नाहीत. मी प्रेग्नंट राहीन किंवा काहीही झालं.'  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

यामुलाखतीत राखी फक्त प्रेग्नंसी विषयी बोलली नाही तर सिंगल पेरेंटिंगविषयी देखील बोलली आहे. राखीनं तिच्या प्रेग्नंसीविषयी अजून काही बोलण्यावर नकार दिला. तर याविषयावर तिला सध्या काही बोलायचे नाही असं म्हटले. राखी म्हणाली, 'लग्नाविषयी सांगणं खूप महत्त्वाचं झालं होतं. हे लोकांसमोर आलं नसतं तर खूप त्रास झाला असता.' राखी पुढे म्हणाली की, ती खूप घाबरली आहे, त्यामुळे तिच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. जर ती सिंगल मदर झाली तरी ती आदिलवर शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम करत राहील.

हेही वाचा : बच्चन कुटुंबाला धक्का; प्रसिद्ध डायरेक्टरचा Aishwarya Rai वर गंभीर आरोप!

आदिल खाननं त्यांच्या विवाहाला नकार दिल्यानंतर राखी सावंत दु: खी आहे. तिनं हा विवाह वैध असल्याचे सांगितले. राखीनं नुकतीच टाईम्स नाऊला दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 'त्याच्या बहिणीच्या लग्नामुळे त्याने मला एक वर्ष आमचा विवाह उघड न करण्यास सांगितले. मी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि बिग बॉस मराठी सीझन 4 मध्ये गेले. जेव्हा मी त्या घरात होते, तेव्हा घराबाहेर अनेक गोष्टी घडल्या, ज्या माझ्या हातात नव्हत्या. त्यामुळे मी लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मी घाबरले होते. तो माझ्यावर खूप प्रेम करतो, पण तो आमच्या विवाहाला का नाकारतोय? त्याच्या कुटुंबाकडून नक्कीच दबाव येत असावा.'