Rakhi Sawant Arrested : बॉलिवूडमधील ड्रामा क्वीन राखी सावंतला (Rakhi Sawant) आंबोली पोलिसांनी (Aamboli Police Station) ताब्यात केल्याची बातमी समोर येत आहे. अभिनेत्री शर्लिन चोप्राने (Sherrlyn Chopra) 'ट्विटर'वर ही माहिती दिली आहे. राखी सावंत ही आज, गुरुवारी दुपारी 3 वाजता पती आदिलसोबत डान्स अकादमी सुरू करणार होती, त्यापूर्वीच आंबोली पोलिसांनी तिला शर्लिन चोप्रा प्रकरणी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणामुळे बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
शर्लिन चोप्राने ट्वीट करून म्हटलं की, 'ताजी बातमी!!! आंबोली पोलिसांनी FIR 883/2022 प्रकरणी राखी सावंतला अटक केली आहे. काल राखी सावंतचा ABA 1870/2022 मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला.'' नोव्हेंबर 2022 मध्ये शर्लिन चोप्राने राखी सावंत विरोधात तक्रार दाखल केली होती. तिने पत्रकार परिषदेत तिचा अश्लिल व्हिडिओ दाखवताना असभ्य भाषा वापरल्याचा आरोप केला होता.
आंबोली पोलिसांनी राखीला ताब्यात घेतलं. काही महिन्यापूर्वी शर्लिन चोप्रा हिने राखी सावंतवर आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो व्हायरल केल्याचा आरोप आहे. यानंतर शर्लिनच्या तक्रारीवरून आंबोली पोलिसांनी राखी सावंतविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
शर्लिनच्या तक्रारीवरुन नोव्हेंबर 2022 मध्ये माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत राखीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांकडून वारंवार प्रयत्न करूनही ती येत नव्हती. त्यामुळे गुरुवारी पोलिस पथकाने तिला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आणले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. राखी सावंतचा अटकपूर्व जामीन बुधवारी मुंबईच्या सेशन कोर्टाने फेटाळला होता, त्यानंतर राखीला पोलिसांनी राखीला ताब्यात घेतलं आहे. राखीला पोलिसांकडून अटक होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, साजिद खानवरून (Sajid Khan) शर्लिन चोप्रा आणि राखी सावंत यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक देखील सुरू होती. दोघीही एकमेकांवर घणाघाती आरोप करत आहेत.