... म्हणून राखी सावंतला अश्रू अनावर

पाहा हे व्हिडिओ 

Updated: Sep 23, 2019, 03:26 PM IST
... म्हणून राखी सावंतला अश्रू अनावर title=

मुंबई : राखी सावंत गेल्या काही दिवसांपासून हैराण आहे. आणि याचं कारण आहे तिचं लग्न. राखी सावंतच्या लग्नाबाबत प्रश्न विचारले जात आहेत. राखी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत आहे. यावरून असंच वाटतंय की, राखीच्या आयुष्यात काही आलबेल नाही. 

राखीचा नवरा कामानिमित्त लंडनमध्ये असतो त्यामुळे या दोघांना एकत्र फार कमी वेळ मिळतो. राखीचं लग्न होऊन आता एकच महिना झाला असून या दोघांमध्ये खूप अंतर निर्माण झालं आहे. राखीने आता असे व्हिडिओ शेअर केलेत ज्यावरून कळतंय की, ती आपल्या नवऱ्याला खूप मिस करतेय. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

राखी सावंतने एका व्हिडिओत म्हटलंय की, तुम्ही जे बोलाल ते मी ऐकेन. तुम्ही जे सांगाल ते मी करेन. पण मला टाळू नका.... अशा आशयाचा हा व्हिडिओ आहे. यावरून अंदाज येतोय की, राखी आपल्या नवऱ्याला भरपूर मिस करत आहे. राखी आपल्या या पोस्टमध्ये अनेक दुःखी गाणी शेअर करत आहे. आपल्या नवऱ्यापासून दूर राहणं तिला काही जमत नसल्याचं यावरून कळतंय. 

राखी सावंत कायम या ना त्या कारणाने चर्चेत राहत असे. राखी सावंतचा हा व्हिडिओ भरपूर लोकांनी पाहिला असून त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.