'ती' माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक; रजनीकांत यांनी बोलून दाखवली मनातली खंत

Rajinikanth turns 73: सुपरस्टार रजनीकांत यांचा आज वाढदिवस आहे. त्यांनी वयाच्या 73रीत पदार्पण केले आहे. मात्र, तरीही त्यांचा अभिनय आणि उत्साह कोणत्याही तरुणांला लाजवेल असाच आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Dec 12, 2023, 12:11 PM IST
'ती' माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक;  रजनीकांत यांनी बोलून दाखवली मनातली खंत title=
Rajinikanth turns 73 actor opens up about battling alcoholism

Rajinikanth Birthday: सुपरस्टार रजनीकांत यांचा आज वाढदिवस आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसह बॉलिवूडवरही रजनीकांत यांनी आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. दक्षिणेकडील राज्यांत रजनीकांत यांना देव मानलं जातं. त्यांचे लाखो चाहते आहेत. पण अलीकडेच एका चित्रपटाच्या प्रमोशनादरम्यान रजनीकांत यांनी त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी खंत बोलून दाखवली आहे. तसंच, चाहत्यांनाही त्यांनी आवाहन केलं आहे. 

सुपरस्टार रजनीकांत यांचा अलीकडेच जेलर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील Kaavaalaa गाणं रिलीजच्या कार्यक्रमावेळी रजनीकांत यांनी खूप खुलून गप्पा केल्या होत्या. यावेळी रजनीकांत यांनी त्यांच्या सर्वात वाईट सवयीबद्दलदेखील सांगितले होते. तसंच, चाहत्यांनाही आवाहन केलं होत. रजनीकांत यांनी त्यांच्या दारूच्या सवयीविषयी सांगितलं होतं. दारूच्या आहारी जाणं ही माझी सगळ्यात मोठी चुक होती, असं त्यांनी म्हटलं होतं. 

रजनीकांत यांनी म्हटलं होतं की, दारूच्या व्यसनामुळं माझ्या आयुष्यात बरीच उलथापालथ झाली. रजनीकांत यांनी सांगितलं होतं की, जर मला दारूचे व्यसन लागले नसते तर तर मी समाजाची अधिक चांगली सेवा करु शकलो असतो. तर, कदाचीत खूप चांगले स्टारडम एन्जॉय करु शकलो असतो. 2018 मध्ये काला चित्रपट प्रदर्शित होण्याच्यावेळी रजनीकांत यांनी त्यांच्या दारूच्या व्यसनाबाबत म्हटलं होतं. 

काला चित्रपटात रजनीकांत यांनी एका व्यसनी व्यक्तीची भूमिका साकारली होती. बेफिकीर आणि दारुचे व्यसन असल्यामुळं लक्ष न दिल्यामुळं त्यांच्या पत्नीचा मृत्यू होतो. रजनीकांत यांनी म्हटलं होतं की, हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट होता. तेव्हापासून ते दारू आणि सिगारेटकडे एका निगेटिव्हीटी म्हणून पाहतात. तेव्हापासून रजनीकांत सिगारेट आणि दारूपासून लांब राहू लागले. 

रजनीकांत यांचा 73वा वाढदिवस 

रजनीकांत यांचा आज 73वा वाढदिवस आहे. रजनीकांत हे मुळचे महाराष्ट्रीय आहेत. 12 डिसेंबर 1250 रोजी बंगळूर येथील मराठा हेंद्रे पाटील समाजात झाला आहे.