रजनीकांत यांच्याकडून 'चंद्रमुखी 2'चं कौतुक; कंगनाला डावललं? पाहा ते काय म्हणाले...

Rajnikanth On Chandramukhi 2: सोशल मीडियावर आता कंगनाचा एकच जलवा पाहायला मिळतो आहे. यावर्षी तिचे तीन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्यातील एक चित्रपट कालच प्रदर्शित झाला आहे. ज्याचं नावं आहे 'चंद्रमुखी 2'. यावर आता रजनीकांत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Sep 30, 2023, 01:07 PM IST
रजनीकांत यांच्याकडून 'चंद्रमुखी 2'चं कौतुक; कंगनाला डावललं? पाहा ते काय म्हणाले... title=
Rajinikanth praises chandramukhi 2 p vasu and Raghava Lawrence

Rajnikanth On Chandramukhi 2: बॉलिवूडमध्ये कलाकार हे एकमेकांचे कौतुक करताना दिसतात. कुठला चांगला चित्रपट आला की आणि कुठल्या कलाकार मित्राचे काम आवडले की कायमच आपण पाहतो, त्यांना लोकप्रिय सुपरस्टार कलाकारही शुभेच्छा देतात आणि त्यांच्या कामाचे कौतुक करतात. यावर्षी 'गदर 2' या चित्रपटानं फार मोठ्या प्रमाणात यश मिळवले आहे. कोटीच्या कोटी उड्डाणे घेत हा चित्रपट यावर्षीचा सर्वाधिक विक्रम करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटानं तर अल्पावधीतच फार मोठा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. सलमान खान, शाहरूख खान, आमिर खान यांच्या चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनलाही लाजवेल असं यश सनी देओल याला वयाच्या 65 व्या वर्षी मिळाले आहे. त्यामुळे त्याची चर्चा नाही झाली तरच नवल. अक्षरक्ष: मोठमोठ्या कलाकारांन, सुपरस्टार्सनी या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले आहे. या चित्रपटाचे खुद्द सलमान खानही कौतुक केले होते. 

अशातच आता चर्चा आहे ती म्हणजे रजनीकांत यांची. त्यांचा यावर्षी आलेला 'जेलर' हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटातील 'कव्वाल्ला' हे गाणंही प्रचंड गाजलं आहे. या गाण्याचे रिल्सही तूफान व्हायरल झाले आहेत. तमन्ना आणि रजनीकांत यांच्या डान्सनं हे गाणं अधिकच लोकप्रिय केलं. त्यातून रजनीकांत यांचे वय हे 72 एवढे आहे तर तमन्ना ही 33 ची आहे. म्हणून या गाण्याद्वारे त्यांना ट्रोलही करण्यात आले होते. परंतु तरीही त्यांच्या या गाण्यानं सोशल मीडियावर चांगलाच कल्ला केला होता. आता त्यांच्या या सुपरहीट चित्रपटानंतर चर्चा आहे ती म्हणजे कंगना राणावत हिच्या 'चंद्रमुखी 2' या चित्रपटाची. हा चित्रपट अल्पावधीतच फार लोकप्रिय झाला आहे. 

यावर्षी बॉलीवूडच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर तूफान कमाई केलेली आपण पाहिली. आता साऊथ इंडियन चित्रपटांचा जोरात जलवा पाहायला मिळतो आहे. काल 'चंद्रमुखी 2' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. आता सोशल मीडियावर या चित्रपटाचीही जोरात चर्चा रंगलेली आहे. दोन-तीन महिन्यांपुर्वी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख रिलिज करण्यात आली होती. त्यामुळे या चित्रपटाची जोरात चर्चाही रंगलेली होती. आता या चित्रपटावर दाक्षिणेतले सर्वात लोकप्रिय आणि ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे. 

चंद्रमुखी, राघवा लॉरेन्स, पी. वासू यांचे कौतुक पण कंगना? 

ट्विटवर सध्या त्यांचे पत्र हे व्हायरल होते आहे. @lycaproductions नं रजनीकांत यांचे ट्विट शेअर केले आहे. भाषांतर केल्यावर असे कळते की, त्यात रजनीकांत म्हणतात, ''मी श्री. पी. वासू यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी एक वेगळ्या धाटणीचा चित्रपट अगदी यशस्वीरीत्या लोकांसमोर आणला. प्रेक्षकांचे सर्वाधिक मनोरंजन करून देणारा हा सिनेमा आहे. माझा भाऊ राघवा लॉरेन्स यानं या चित्रपटात सुंदर असा अभिनय केला आहे. सुंपर्ण चित्रपटातील कलाकारांचेही आणि टीमचे खूप अभिनंदन त्यांनीही सुंदर काम केले आहे.'' यावेळी त्यांनी कंगनाचं नावं कुठे घेतलेले दिसत नाहीये. परंतु सर्व टीमचे आणि कलाकारांचे कौतुक या अर्थी त्यांनी तिच्याही कामाला दाद दिली आहे हेही स्पष्ट होते. 

रजनीकांत यांची सरप्राईझ नोट 

राघवा लॉरेन्स काय म्हणाले? 

यावर राघवा लॉरेन्स यांनीही कमेंट केली आहे. ते म्हणतात की, ''हा दिवस माझ्यासाठी फार खास आहे. माझ्या भावाकडून खूप सुंदर असं पत्र आलंय. माझे गुरू. माझे सर्वात आवडते थलावया सुपरस्टार रजनीकांत यांनी केलेली ही स्तुती आमच्या चित्रपटासाठी फार गरजेची होती. तुमचे हे कौतुक आमच्यासाठी फारच मोलाचे आहे. खूप आभार. गुरूवे सारानम''