स्टारडमवर गर्व असलेल्या राजेश खन्ना यांनी बिग बींना म्हटलं होतं 'पनवती'! संतप्त जया बच्चन म्हणाल्या 'ज्या व्यक्तीला...'

Rajesh Khanna - Amitabh Bachchan : राजेश खन्ना यांनी अमिताभ बच्चन यांना पनवती म्हटल्यानं संतापलेल्या जया बच्चन यांनी दिली होती संतप्त प्रतिक्रिया.

दिक्षा पाटील | Updated: Nov 27, 2023, 01:46 PM IST
स्टारडमवर गर्व असलेल्या राजेश खन्ना यांनी बिग बींना म्हटलं होतं 'पनवती'! संतप्त जया बच्चन म्हणाल्या 'ज्या व्यक्तीला...' title=
(Photo Credit : Social Media)

Rajesh Khanna - Amitabh Bachchan : अभिनेता अमिताभ बच्चन हे बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांपैकी एक आहेत. त्यांचे लाखो चाहते आहेत. ही गोष्ट कोणापासून लपलेली नाही. पण एकवेळ होती जेव्हा बॉलिवूड अभिनेता राजेश खन्ना यांच्या हातावर चालतं असं म्हणायचे. ते बॉलिवूडचे पहिल सुपरस्टार म्हणून ओळखले जायचे. राजेश खन्ना यांची लोकप्रियता तर इतकी होती की तर त्यांच्यावर इतक्या भाळल्या होत्या, की ज्या वाटेनं ते जात होते तिथली धूळमाती उचलून कपाळी लावत होत्या. त्यांच्या या स्टारडममुळे राजेश खन्ना अनेकदा असं काही करायचे ज्यावर कोणीही विश्वास बसत नव्हता. 

त्यांच्या स्टारडमवर त्यांना खूप गर्व झाला होता आणि कोणाशीही कसं वागायचं. एकदा तर राजेश खन्ना हे अमिताभ बच्चन यांच्याशी गैरवर्तन केलं होतं. त्यावर अमिताभ यांनी तर काही प्रतिक्रिया दिली नाही. पण त्यांची पत्नी जया बच्चन या शांत बसल्या नव्हत्या. हे त्या वेळेची गोष्ट आहे जेव्हा अमिताभ यांनी नुकतीच चित्रपटसृष्टीत एन्ट्री केली होती. तर राजेश खन्ना हे त्यावेळी सुपरस्टार होते. चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान, जसा वेळ मिळेल तसे अमिताभ हे जया बच्चन यांना भेटायला त्यांच्या चित्रपटाच्या सेचवर जायचे. तेव्हा त्यांना पाहून राजेश खन्ना यांना खूप राग आला आणि ते बिग बींवर चिडले. या दरम्यान, पत्रकारांना हे पाहिलं आणि त्याची बातमी छापली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

राजेश खन्ना यांना अमिताभ यांचे सेटवर येणं पसंत नव्हतं. त्यांनी बिग बींना पनवती देखील म्हटलं. हे सगळं तिथे उपस्थित असलेल्या जया बच्चन यांनी ऐकलं. तर त्यांना फार वाईट वाटलं आणि त्यांनी राजेश खन्ना यांना सडेतोड उत्तर दिलं. जया यांनी म्हटलं की 'ज्या व्यक्तीला आज तुम्ही पनवती म्हणत आहात, एक दिवस तिच व्यक्ती या चित्रपटसृष्टीवर राज्य करेल.' जया बच्चन यांनी केलेलं हे वक्तव्य सत्यात उतरलं आणि अमिताभ बच्चन हे सगळ्यात मोठे कलाकार ठरले. 

हेही वाचा : 'लग्न झालं हे विसरलोच'; विकी जैन आणि सनामध्ये नेमकं काय घडलं?

दरम्यान, अमिताभ यांच्या कामाविषयी बोलायचे झाले तर त्यांचा आणि  प्रभासचा 'कल्कि 2898 एडी' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रभासशिवाय, दीपिका पदुकोण, कमल हासन दिसणार आहेत. हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय रजनीकांत यांच्यासोबत देखील अमिताभ बच्चन दिसणार आहेत.