धक्कादायक : प्रसिद्ध अभिनेत्रीवर भर रस्त्यात जबर मारहाण; अशी झाली अवस्था

नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार एका प्रसिद्ध अभिनेत्रीला रस्त्यात मारहाण झाली आहे. यामध्ये ती गंभीर जखमी झाली आहे.

Updated: Nov 27, 2023, 01:29 PM IST
धक्कादायक : प्रसिद्ध अभिनेत्रीवर भर रस्त्यात जबर मारहाण; अशी झाली अवस्था title=
(फोटो सौजन्य - AP)

मुंबई : सगळ्यात वादग्रस्त रिएलिटी शो नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. विशेष म्हणजे या शो मध्ये होणारी भांडण सगळ्यात जास्त चर्चेत असताता. अनेकदा या शोमध्ये मैत्री होते तर अनेकदा अनेकजण एकमेकांचे दुश्मन होतात तर कधी कोणामध्ये प्रेमाचे बंध जुळतात. पण नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार एका प्रसिद्ध अभिनेत्रीला रस्त्यात मारहाण झाली आहे. यामध्ये ती गंभीर जखमी झाली आहे. या हल्ल्याचं कनेक्शन बिग बॉसशी असल्याचं अभिनेत्रीने सांगितले आहे.

नुकतीच या अभिनेत्रीने ट्विटरवर एक पोस्ट करत या बाबतची माहिती दिली आहे. पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने लिहीलं की, एवढं भयंकर हल्ला कोणी केला हे देवाला माहितीये.  प्रदीप अँटनी समर्थक. मी माझा  #BiggBossTamil7 रिव्हू संपवला आणि जेवली आणि नंतर माझ्या कारकडे गेले. जी मी माझ्या बहिणीकडे पार्क केली होती. तिथे जाताना फार अंधार होता आणि एक माणूस बाहेरुन आला आणि म्हणाला, लाल कार्ड कुडुक्रीनगला त्याने वेराचं समर्थन केलं आणि माझ्या चेहऱ्यावर हल्ला केला आणि तिथून पळून गेला. त्यावेळी मला खूप वेदना होत होत्या. माझ्या चेहऱ्यावरून खूप रक्तस्त्राव होत होता. मी किंचाळत होते. रात्रीचा एक वाजला होता. यावेळी तिथे कोणीच नव्हतं. नंतर मी माझ्या बहिणीला हाक मारली. मी किंचाळले. यानंतर  त्यांनी मला या घटनेची पोलिसात तक्रार करण्याचे आवाहन केलं मात्र मी तिला सांगितलं की, माझा या प्रक्रियेवरुन विश्वास उडाला आहे.
 
हे सगळं प्रकरण साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री वनिता विजयकुमारसोबत घडलं आहे. नुकतीच तिने तिच्या ट्विटरवरुन ही पोस्ट शेअर करत तिच्या चाहत्यांना माहिती दिली आहे. याचबरोबर तिने तिच्या दुखापतीचा एक फोटो शेअर केला आहे. तिची ही अवस्था पाहून अनेकांना धक्का बसत आहे.

पुढे अभिनेत्रीने लिहीलं आहे की, मी प्राथमिक उपचार घेतले आणि माझं घर सोडलं आहे. माझ्यावर ज्याने हल्ला केला त्याला मी ओळखू शकली नाही. त्याने हल्ला केल्यावर तो माझ्यावर वेड्यासारखा हसला. जे मला खूप त्रास देतं. मी सध्या सगळ्यातून ब्रेक घेत आहे. कारण स्क्रिनवर दिसण्यासारखं माझं शरिर राहिलं नाही. जे लोकं त्रास देणार्‍यांना पाठिंबा देतात त त्यांच्यासाठी धोका एक फूट अंतर ठेवून राहा.''