'तुमसे मिलके दिलका जो हाल' दिशाला भेटल्यानंतर राहुलची अशी झाली अवस्था

राहुल वैद्यने बि ग बॉसच्या घरात दिशाला प्रपोज केलं...      

Updated: Mar 19, 2021, 09:34 AM IST
'तुमसे मिलके दिलका जो हाल' दिशाला भेटल्यानंतर राहुलची अशी झाली अवस्था title=

मुंबई : बिग बॉसचा स्पर्धक राहुल वैद्य सोशल मीडियावर कायम ऍक्टिव्ह असतो.  बिग बॉस 14 चा रनरअप  ठरलेला राहुल कायम त्याची गर्लफेंड दिशा परमारसोबत दिसतो. शिवाय अनेक वेळा त्यांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं आहे. आता सध्या राहुल आणि दिशाचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोघेही डान्स करताना दिसत आहेत. राहुल आणि दिशाच्या एका मित्राच्या लग्नातला हा व्हिडिओ आहे. 

व्हिडिओमध्ये राहुल आणि दिशा अभिनेता शाहरूख खानच्या 'मैं हु ना' सिनेमातील 'तुमसे मिलके दिलका जो हाल' या गाण्यावर ताल धरताना दिसत आहेत. शाहरूख स्टारर 'मैं हु ना' 2003 रोजी प्रदर्शित झाला होता. पण  आज देखील सिनेमातील गाण्यांनी चाहत्यांना वेड लावलं आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Meghaa R Israni (@meghaisrani)

सध्या राहुल आणि दिशाच्या या व्हिडिओवर  चाहत्यांच्या कमेंटचा वर्षाव होत आहे. शिवाय त्यांच्या लग्नाच्या चर्चादेखील वाऱ्यासारख्या पसरत आहेत.  बिग बॉसच्या घरात राहुलने दिशाला मागणी घातली होती. त्यानंतर  व्हेलेंटाईन डेचं औचित्य साधन दिशाने राहुलला होकार दिला. 

राहुलने त्यांच्या लग्नाला दुजोरा दिला आहे. दोघांचे कुटुंब लग्नाच्या तयारीला लागले आहेत. पण दिशा आणि राहुलच्या लग्नात फार कमी पाहुण्यांना आमंत्रण दिलं जाणार आहे. अशी  माहिती राहुलने एका  मुलाखती दरम्यान दिली.