मुंंबई : बॉलिवूड अभिनेता विक्की कौशल आणि अभिनेत्री आलिया भट्टच्या 'राझी' चित्रपटाला चाहत्यांची पसंती मिळाली आहे. 'राझी' चित्रपटामध्ये आलिया भट्ट एका गुप्तहेराची भूमिका साकारली आहे. लग्नानंतर भारतीय गुप्तहेर पाकिस्तानामध्ये जाऊन कसं काम करते हे पाहणं उत्सुकतेचं आहे.
मेघना गुलजार दिग्दर्शित राझी चित्रपटाने बॉक्सऑफिसवरही दमदार कामगिरी केली आहे. पहिल्या विकेंडला 32.94 कोटींची कमाई केली आहे. तरण आदर्शने केलेल्या ट्विटनुसार, सोमवारी 'राझी' चित्रपटाने 6.30 कोटींची कमाई केली आहे.
#Raazi shows EXCELLENT HOLD on Mon... Decline on Mon [vis-à-vis Fri] is a mere 16.33% - SUPERB... The film has found pan-India acceptance, which is a rarity these days... Fri 7.53 cr, Sat 11.30 cr, Sun 14.11 cr, Mon 6.30 cr. Total: 39.24 cr. India biz.
— taran adarsh (@taran_adarsh) May 15, 2018
'राझी' हा चित्रपट सत्यकथेवर आधारित आहे. 1971 साली झालेल्या भारत पाकिस्तान युद्धाची या चित्रपटाला पार्श्वभूमी आहे. आलिया या चित्रपटात एका काश्मिरी मुलीची भूमिका साकार करते. पाकिस्तानामध्ये राहून आलिया भारतासाठी गुप्तहेर म्हणून काम पाहते. या चित्रपटाची कहाणी हरिंदर सिक्का यांची कादंबरी 'कॉलिंग सहमत' यावर आधारित आहे.