मुंबई : हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार मिथुन चक्रवर्ती सध्या पाठीच्या दुखण्याने हैराण झाले आहेत. काही वर्षांपूर्वी झालेल्या अपघातानंतर मिथुन चक्रवर्ती यांचं दुखणं वाढलं आहे. या दुखण्यावर देशा-परदेशात त्यांनी उपचार घेतले आहेत. मात्र पाठीचे दुखणे मिथुन चक्रवर्तींना त्रासदायक ठरत आहेत.
मिथुन चक्रवर्ती सध्या उपचारासाठी दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. यापूर्वी त्यांनी अमेरिकेत लॉस एंजेलिसमध्ये उपचार घेतले आहेत. पाठीच्या दुखण्यामुळे मिथुन चक्रवर्ती यांचे अनेक प्रोजेक्ट्स रेंगाळले आहेत. पाठीच्या दुखण्यामुळे त्रस्त झाल्याने त्यांनी राज्यसभेच्या खासपदाचाही राजीनामा दिल्याची माहिती देण्यात आली आहे.
मिथुन चक्रवर्ती 2009 साली एका चित्रपटादरम्यान स्टंट करत होते. चॉपरमधून उडी मारण्याच्या वेळेस टाईमिंग चुकल्याने मिथुन चक्रवर्ती यांना गंभीर दुखापत झाली. त्यामधूनच पाठीचे दुखणे वाढल्याचे सांगितले जाते.