'या' चिमुकलीचा 'सामी' डान्स Video पाहून दिवसभराचा थकवा क्षणात दूर होईल

संपूर्ण देशभरातील आणि जगातील प्रेक्षकांवर जादू केली.   

Updated: Apr 4, 2022, 05:20 PM IST
'या' चिमुकलीचा 'सामी' डान्स Video पाहून दिवसभराचा थकवा क्षणात दूर होईल  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अल्लू अर्जुनची मध्यवर्ती भूमिका असणारा 'पुष्पा- द राईज' हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला. पाहता पाहता या चित्रपटानं फक्त दाक्षिणात्य प्रेक्षकवर्गच नाही, तर संपूर्ण देशभरातील आणि जगातील प्रेक्षकांवर जादू केली. 

'पुष्पा'चे डायलॉग्स म्हणू नका किंवा त्यातील गाणी. एखादा चित्रपट आपल्यावर किती प्रभाव टाकतो हेच या चित्रपटानं दाखवून दिलं. 

सोशल मीडियावर तर चित्रपटाशीसंबंधीत असंख्य रिल्स व्हायरल झाले. आता त्यात आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे. 
 
सेलिब्रिटी नृत्य दिग्दर्शक रेमो डिसूझा यानं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओचे हॅशटॅग पाहता या चिमुरडीचं नाव आद्यश्री उपाध्याय असल्याचं कळत आहे. 

ती सध्या डीआयडी लिटील मास्टर या डान्स रिअॅलिटी शोची स्पर्धक असल्याचं कळत आहे. 

ही चिमुकली आराध्या 'पुष्पा' चित्रपटातील 'सामी' या गाण्यावर जबरदस्त ठेका धरताना दिसत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Remo Dsouza (@remodsouza)

रश्मिका मंदानालासुद्धा टक्कर देतील असे हावभाव आणि त्याहीपेक्षा धमाकेदार डान्स ही मुलगी इथं सादर करताना दिसत आहे. 

दिवसभरात कामाच्या व्यापानं तुम्ही थकले असाल, तर हा व्हिडीओ पाहून 'दिन बन गया' असंच तुम्हीही म्हणाल यात शंका नाही.