मुलीच्या घटस्फोटामागोमाग रजनीकांत यांना आणखी एक धक्का; चाहत्यांना चिंता

सूत्रांच्या माहितीनुसार घटस्फोटाची ही ठिणगी विझवण्याचा प्रयत्न रजनीकांत करत आहेत. तोच त्यांना आणखी एक धक्का मिळाला आहे. 

Updated: Feb 3, 2022, 01:47 PM IST
मुलीच्या घटस्फोटामागोमाग रजनीकांत यांना आणखी एक धक्का; चाहत्यांना चिंता  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपल्या जगावेगळ्या स्टाईलसाठी आणि दमदार चित्रपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या सुपरस्टार रजनीकांत यांच्या प्रसिद्धीबाबत काय सांगावं. कित्येक दशकं चित्रपटजगत गाजवणारा हा अभिनेता सध्या मात्र काहीशा तणावाच्या परिस्थितीतून जात आहे. 

मुलगी ऐश्वर्या आणि जावई धनुष यांच्या नात्यात आलेला दुरावा, त्यांना चिंतेत आणण्यास कारणीभूत ठरला आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार घटस्फोटाची ही ठिणगी विझवण्याचा प्रयत्न रजनीकांत करत आहेत. तोच त्यांना आणखी एक धक्का मिळाला आहे. 

त्यांना हा धक्का दिला आहे, Pushpa फेम अभिनेता अल्लू अर्जुन याने. (Allu Arjun)

तुम्हालाही प्रश्न पडला असेल, की अल्लू अर्जुनने इतक्या दिग्गज कलाकारासोबत नेमकं काय केलं? 

तर, अभिनयाच्या कारकिर्दीमध्ये दिवसागणित यशाची शिखरं सर करणाऱ्या अल्लू अर्जुननं थलैवा रजनीकांत यांना पिछाडीवर टाकलं आहे. 

साऱ्या देशात आणि जगातही त्याची लोकप्रिया इतकी वाढली आहे की त्याच्या ट्विटर फॉलोअर्सचा आकडा 6.5 मिलियनवर पोहोचला आहे. 

दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजिवी आणि रजनीकांत यांनाही त्यानं मागे टाकलं आहे. रजनीकांत यांना ट्विटरवर 6.1 मिलियन फॉलोअर्स आहेत. 

तर, चिरंजीवी यांना 1.2 मिलियन इतके फॉलोअर्स आहेत. गेल्या काही काळापासून अल्लू अर्जुन ट्विटरवर चांगलाच सक्रिय असल्याचं पाहिलं जात आहे. ज्यामुळं सहाजिकच त्याच्या फॉलोअर्सचा आकडा वाढण्यात वावगं काही नाही. 

रजनीकांत यांच्या लोकप्रियतेला आतापर्यंत फार कमी व्यक्तींनीच मागे टाकलं होतं. आता त्याच यादीमध्ये अल्लू अर्जुनच्याही नावाचा समावेश झाला आहे.