मुंबई : टॉलीवूड सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांचा नुकताच प्रदर्शित झालेला 'पुष्पा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई करत सगळे विक्रम मोडीत काढले आहेत. मात्र, या चित्रपटाच्या एका सीनने प्रेक्षकांना अस्वस्थ केलं आहे. चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदान्नाचा 'ब्रेस्ट टच' सीन दाखवण्यात आला आहे. जो पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये भितीचं वातावरण तयार झालं असून या सीनमुळे नवा वाद सुरु झाला आहे.
अल्लू अर्जुनच्या आणि रश्मिका मंदान्नाच्या 'ब्रेस्ट टच'वर प्रेक्षकांनी आक्षेप घेतला होता. ज्याच्या पार्श्वभूमीवर निर्मात्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. लोकांचा रोष पाहता निर्मात्यांनी हा वादग्रस्त सीन हटवण्याचा निर्णय घेतला आहे. खरं तर, श्रीवल्लीच्या भूमिकेत दिसणारी रश्मिका मंदान्ना पुष्पा राज म्हणजेच अल्लू अर्जुनबद्दल आपल्या भावना व्यक्त करू लागते.
नंतर, अल्लू अर्जुन रश्मिकाच्या स्तनाला स्पर्श करताना दिसतो. हे सीन पाहून चाहते थक्क झाले आहेत तसंच टॉलिवूड सिनेमासृष्टीतही भितीचं वातावरण तायार झालं आहे.
रोमँटिक सीनमुळे नाराज झालेल्या अल्लू अर्जुनच्या चाहत्यांमध्ये सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. लोकांचा वाढता रोष पाहून निर्मात्यांनी तातडीने कठोर पावलं उचलत चित्रपटातील दृश्य हटवून नव्या पद्धतीने प्रसारित करायला मान्यता दिली.
'पुष्पा: द राइज' 17 डिसेंबरला रिलीज झाला आहे. या चित्रपटाला चाहत्यांचा आणि समीक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाने 3 दिवसात वर्ल्डवाइड 150 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. या चित्रपटाने पहिल्या वीकेंडला म्हणजे 3 दिवसांत 173 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी जगभरात 57 कोटींची कमाई केली आहे. याआधी या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी ४५ कोटी आणि पहिल्या दिवशी ७१ कोटींची कमाई केली होती.