'पुष्पा' सिनेमाच्या यशानंतर अभिनेता अल्लू अर्जुनची 'या' सिनेमात वर्णी

'पुष्पा : द राइज' या चित्रपटाने कमाईचे सगळे विक्रम मोडले आहेत. 

Updated: Jan 8, 2022, 06:49 PM IST
'पुष्पा' सिनेमाच्या यशानंतर अभिनेता अल्लू अर्जुनची 'या' सिनेमात वर्णी title=

मुंबई : 'पुष्पा : द राइज' या चित्रपटाने कमाईचे सगळे विक्रम मोडले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या शानदार अभिनयाने सजलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत 306 कोटींची कमाई केली आहे. चित्रपटात अल्लू ट्रक ड्रायव्हरच्या भूमिकेत आहे. जो लाल चंदनाची तस्करी करण्यास मदत करतो.

या काळात प्रदर्शित झालेले बॉलीवूड चित्रपट, 83 आणि स्पायडरमॅन: फार फ्रॉम होम या सिनेमांना देखील कलेक्शनच्या बाबतीत 'पुष्पा: द राइज' सिनेमाने मागे टाकलं आहे. अल्लू अर्जुनच्या आगामी काही चित्रपटांवर एक नजर टाकूया जे येत्या काळात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा: द राइज' या चित्रपटाचा दुसरा भाग जवळपास निश्चित झाला आहे. 'पुष्पा: द राइज'च्या दुसऱ्या भागाची स्क्रिप्ट तयार करण्यात आली असून सगळं काही ठीक असल्यास हा चित्रपट 17 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. अल्लू अर्जुनचा पुढचा चित्रपट आयकॉन असेल. या चित्रपटाचं दिग्दर्शन दिग्दर्शक वेणू श्रीराम करणार आहेत. तर पूजा हेगडे आणि क्रिती शेट्टी या दोन महिला प्रमुख कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत.

वृत्तांवर विश्वास ठेवला तर अल्लू अर्जुन प्रसिद्ध चित्रपट KGF चे दिग्दर्शक प्रशांत नील यांच्या चित्रपटात देखील दिसणार आहे. या चित्रपटात हाय व्होल्टेज अॅक्शन ड्रामा पाहायला मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे. यासोबतच अल्लू अर्जुन दिग्दर्शक कोरतला सिवा यांचा चित्रपट AA21 आणि तमिळ चित्रपट दिग्दर्शक ए.आर. मुरुगादास यांच्या आगामी चित्रपटातही दिसणार आहे.