कुटुंब नियोजन, वैवाहिक जीवनावर प्रियांकाचं स्पष्टीकरण

प्रियांका तिच्या व्यावसायीक जीवनापेक्षा खाजगी जीवनामुळे जास्त चर्चेत असते. 

Updated: Oct 2, 2019, 03:34 PM IST
कुटुंब नियोजन, वैवाहिक जीवनावर प्रियांकाचं स्पष्टीकरण title=

मुंबई : बॉलिवूडची 'देसीगर्ल' प्रियांका चोप्रा तब्बल तीन वर्षांनंतर 'द स्काय इज पिंक' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांचे मनोरंजन करणार आहे. अभिनेता फरहान अख्तर आणि अभिनेत्री झायरा वसीम यांच्यासोबत ती चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. सध्या प्रियांका चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. प्रियांका तिच्या व्यावसायीक जीवनापेक्षा खाजगी जीवनामुळे जास्त चर्चेत असते. प्रियांका-निकच्या चर्चा सोशल मीडियावर कायम रंगलेल्या असतात. 

लग्नानंतर प्रियांकाने तिच्या खाजगी जीवनाबद्दल मोठा खुलासा केला आहे. काही दिवसांपूर्वी प्रियांकाचा एक फोटो चांगलाच व्हायरल होत होता. त्यामध्ये अनेकांनी ती गरोदर असल्याचा अदांज व्यक्त केला होता. परंतु तिच्या आईने ती गरोदर नसल्याचे सांगितले. 

'द स्काय इज पिंक' चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान तिने तिच्या खाजगी जीवनाचा खुलासा केला. 'सध्या माझं लक्ष पूर्ण माझ्या कामाकडे आहे. हाती असलेल्या प्रोजेक्ट्सवर काम करणं देखील फार गरजेचं आहे. त्याचप्रमाणे कुटुंब नियोजन देखिल तितकचं महत्वाचं आहे. प्रोजेक्ट्स पूर्ण होताच मुलांचा विचार करेल.' अशाप्रकारे तिने तिच्या वैवाहिक जीवनाबद्दल स्पष्टीकरण दिलं.  

'द स्काय इज पिंक' शिवाय क्रिस पॅट्सच्या 'Cowboy Ninja Viking' या चित्रपटात प्रियंका दिसण्याची शक्यता आहे. याशिवाय तिच्याकडे हॉलिवूड्चे अनेक प्रोजेक्टस देखील आहेत. 'द स्काय इज पिंक' चित्रपट ११ ऑक्टोबरमध्ये रूपेरी पडद्यावर होणार आहे.