अन् प्रियांका चोप्रा चालत्या गाडीतून खाली पडली ...

हिंदी सिनेमांमधून थोडा ब्रेक घेऊन सध्या प्रियंका चोप्रा सध्या हॉलिवूडमध्ये काम करताना दिसत आहे.

Updated: Nov 18, 2017, 11:01 AM IST
अन् प्रियांका चोप्रा चालत्या गाडीतून खाली पडली ...  title=

मुंबई : हिंदी सिनेमांमधून थोडा ब्रेक घेऊन सध्या प्रियंका चोप्रा सध्या हॉलिवूडमध्ये काम करताना दिसत आहे.

'क्वॉंटिको'मधून प्रियंका जगभरात पोहचली आहे. सध्या या सीरीजच्या तिसर्‍या सीझनचे काम सुरू आहे. 

सहकलाकार रॉशेल टॉवेसोबतची धमालमस्ती 

प्रियंका कामातून वेळ काढून सहकलाकारांसोबत  मस्तीदेखील करत आहे. प्रियंकाने एक खास व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. 

 

प्रियंका गाडीतून खाली पडतेय आणि तिचा साथीदार वाचवण्याचा प्रयत्न करतोय असे तुम्हांला वाटते. पण मूळात हा केवळ आभास आहे. खरंतर या व्हिडिओमध्ये प्रियंका आणि रॉशेल टॉवे एका गाडीत उभे आहेत. त्यांच्या मागील पडदा केवळ वेगाने सरकत आहे. त्यामुळे जणूकाही गाडीच चालतेय असा भास पाहताना होतोय. 

प्रियंका चोप्राची हॉलिवूडमधील घोडदौड 

प्रियंका सध्या अमेरिकेत  आहे. क्वॉंटिकोच्या शूटिंगसोबतच ती ' इजंट इट रोमॅंटिक' हा हॉलिवूड सिनेमादेखील शूट करत आहे. हा प्रियंकाचा दुसरा हॉलिवूड सिनेमा आहे. भारतामध्ये हिंदी आणि इतर भाषिक सिनेमांची निर्मिती केल्यानंतर आता प्रियंका हॉलिवूडमध्ये आपलं नशीब  आजमावून पाहत आहे. यामध्ये प्रियंका यशस्वीदेखील ठरली आहे. प्रियंकाला दोनदा पिपल्स चॉईस अवॉर्डने गौरवले आहे.