गरब्याच्या गाण्यांवर प्रियांका ताल धरते तेव्हा

प्रियांकाचा गरबा पाहाच..

Updated: Sep 30, 2019, 03:40 PM IST
गरब्याच्या गाण्यांवर प्रियांका ताल धरते तेव्हा title=

मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या तिच्या आगामी 'द स्काय इज पिंक' चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहे. लग्नानंतर तिचा हा पहिला बॉलिवूड चित्रपट आहे. चित्रपटात ती त्याचप्रमाणे अभिनेता फरहान अख्तर आणि अभिनेत्री झायरा वसीम मुख्य भूमिका साकारणार आहे. याच दरम्यान ती अहमदाबादच्या दुर्गेच्या मंडळाबाहेर गरबा खेळताना दिसत आहे. यावेळेस तिच्यासोबत सहकलाकार रोहित सराफ देखील गरब्याच्या गाण्यांवर थिरकताना दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Priyanka Chopra Jonas and Rohit Saraf celebrate first day of Navratri in Ahmedabad as they promote their upcoming film #priyankachopra rohitsaraf @viralbh

अहमदाबादमधून काही प्रियांका आणि रोहितचे काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत. काळ्या आणि चंदेरी रंगाच्या लेहेंग्यामध्ये प्रियांकाने सर्वांचे लक्ष वेधले होते. तर रोहित काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये आकर्षक दिसत होता.

'द स्काय इज पिंक' शिवाय क्रिस पॅट्सच्या 'Cowboy Ninja Viking' या चित्रपटात प्रियंका दिसण्याची शक्यता आहे. याशिवाय तिच्याकडे हॉलिवूड्चे अनेक प्रोजेक्टस देखील आहेत. या चित्रपटात तिच्यासोबत फरहान अख्तर आणि जायरा वसीम देखील झळकणार आहेत. 'द स्काय इज पिंक' चित्रपट ११ ऑक्टोबरमध्ये रूपेरी पडद्यावर होणार आहे.