पती असून सुद्धा नसल्यासारखा... प्रियांकाच्या 'त्या' फोटोमुळे एकच खळबळ

त्यानंतर चाहते अभिनेत्रीला अनेक प्रश्न विचारत आहेत.

Updated: Feb 28, 2022, 05:54 PM IST
  पती असून सुद्धा नसल्यासारखा... प्रियांकाच्या 'त्या' फोटोमुळे एकच खळबळ title=

मुंबई : बॉलिवूडनंतर आता हॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा एका बाळाची आई झाली आहे. प्रियांका आणि निक जोनास यांनी काही महिन्यांपूर्वी आनंदाची बातमी देताना चाहत्यांना सांगितले की, त्यांनी सरोगसीद्वारे त्यांच्या बाळाचं स्वागत केले आहे.

अशा परिस्थितीत आजकाल प्रियांका आणि निक आपल्या मुलीसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करत आहेत. पण ते दोघेही सुट्टीचा दिवस स्वतःसाठी काढत आहेत. अलीकडेच प्रियांका चोप्राने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये प्रियांका आणि निक संडेचा दिवस एकत्र घालवताना दिसत आहेत.

पण या व्हिडिओमध्ये प्रियांका निकला ब्लर करते, त्यानंतर चाहते अभिनेत्रीला अनेक प्रश्न विचारत आहेत.

प्रियांका चोप्राने शेअर केलेला व्हिडिओ काही फोटो एकत्र करुन बनवण्यात आला आहे. या फोटोंमध्ये प्रियांका पती निक जोनाससोबत कारमध्ये बसलेली आहे. यादरम्यान प्रियांका चोप्राचा चेहरा स्पष्ट दिसत आहे.

पण प्रियांकाच्या शेजारी बसलेल्या निकचा चेहरा ब्लर आहे. फोटोंमध्ये निकचा चेहरा अस्पष्ट दिसत आहे. त्यामुळे चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. पती सोबत असून सुद्धा दिसत नसल्याने या फोटोची खूपच चर्चा होत आहे.

प्रियांकाने कॅप्शनमध्ये काही इमोजी शेअर केले आहेत. प्रियांकाच्या व्हिडिओला फॅन्स खूप पसंत करत आहेत. या कपलचा हा फोटो पाहून चाहत्यांना प्रश्न देखील पडला आहे. की तिने निकला ब्लर का केले आहे. त्यामुळे पतीला ब्लर का केले ? असा प्रश्न देखील चाहते विचारत आहेत.