समुद्रकिनारी प्रियांका-निकचा रोमँटिक अंदाज....फोटोंवर कमेंट्सचा पाऊस

प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असते.  आता ती आपल्या लाडक्या नवऱ्यासोबत समुद्रकिनारी काही खास क्षण घालवताना दिसत आहे

Updated: Apr 18, 2022, 02:00 PM IST
समुद्रकिनारी प्रियांका-निकचा रोमँटिक अंदाज....फोटोंवर कमेंट्सचा पाऊस title=

मुंबईः प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असते.. कुटुंबातील छोट्या-छोट्या क्षणांचं सेलिब्रेशन ती तिच्या चाहत्यापर्यंत पोहोचवत असते. लग्नानंतर परदेशात प्रियांका स्थिरावली असून जोनास कुटुंबात चांगलीच रुळली आहे.

प्रियांकाचं निकसोबतचं बाँडिंग किती घट्ट आहे हे तिच्या फोटोजवरून दिसून येतं. आता ती आपल्या लाडक्या नवऱ्यासोबत समुद्रकिनारी काही खास क्षण घालवताना दिसत आहे.

करियर सांभाळून प्रत्येक जोडप्याने एकमेकांना वेळ देणं खरंतर अगदीच महत्त्वाचं. प्रियांका-निकही त्यांच्या व्यस्त कामकाजातून वेळ काढत समुद्रकिनारी काही क्षण घालवले आहेत.

पहिल्या फोटोत निकच्या हातात हात देत प्रियांकाने स्वतःचा चेहरा मात्र लपवला आहे. 

समुद्रकिनारी आढळणारे रंगबेरंगी दगड गोळा करण्याचा मोह प्रियांकाला आवरता आला नाही. हे दगड हातात घेत तिनं ते फोटोतून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे

निरव शांत समुद्र किनारा आणि किनाऱ्याकडे डोकावणारा सूर्य असं नयमरम्य चित्र प्रियांकाने आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं आहे.

 नवऱ्याचा हात हातात घेत आणि सूर्याकडे पाठ करून समुद्रकिनाऱ्यावर पडलेली सावली असा रोमँटिक फोटो प्रियांकाने तिच्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे

यासह गार्डनमधला एक फोटो शेअर करत प्रियांका आणि निकने चाहत्यांना इस्टरच्या शुभेच्छा दिल्या आहेत

प्रियांकाचे हे फोटो तिच्या चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस पडत आहे. प्रियांकाचा यलो ड्रेस तरुणींना चांगलाच भुरळ घालत आहे. प्रियांका सध्या परदेशात असली तरी या ना त्या कारणाने नेहमी चर्चेत असते. मात्र प्रियांका परत भारतात कधी येणार याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना आहे.