प्रिया बापट लवकरच झळकणार एका नव्या भूमिकेत, शूटींग सुरु

या कार्यक्रमात तिच्याबरोबर बरूण सोबती, अंजली आनंद हे कलाकारही झळकणार आहेत. यात मैत्री, पालकत्व आणि आधुनिक जीवनातील आव्‍हाने यावर भाष्य केले जाणार आहे. 

Updated: Mar 13, 2024, 04:36 PM IST
प्रिया बापट लवकरच झळकणार एका नव्या भूमिकेत, शूटींग सुरु title=

Priya Bapat New Show : मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून प्रिया बापटला ओळखले जाते. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रियाने बरंच नाव कमावलं. सिटी ऑफ ड्रिम्स या वेबसीरिजनंतर प्रिया बापट आता लवकरच एका नव्या हिंदी कार्यक्रमात  झळकणार आहे. नुकतंच तिने याबद्दल पोस्ट शेअर करत घोषणा केली आहे. 

प्रिया बापट ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती नेहमी विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. आता प्रियाने तिच्या चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. ती लवकरच एका नवीन कार्यक्रमात झळकणार आहे. 'रात जवान है' असे या कार्यक्रमाचे नाव असून हा हिंदी कार्यक्रम आहे. सोनी लिव्हवर हा कार्यक्रम प्रसारित केला जाणार आहे. या कार्यक्रमात तिच्याबरोबर बरूण सोबती, अंजली आनंद हे कलाकारही झळकणार आहेत. 

प्रिया बापटने दिली चाहत्यांना गुडन्यूज

प्रिया बापटने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने 'रात जवान है' या सोनी लिव्हच्या आगामी शोच्या शूटींगला सुरुवात केल्याचे सांगितले आहे. "यारा ओ यारा मिलना हमारा जाने क्या रंग लाए गा. मला या नवीन टीमचा भाग झाल्याचा खूप खूप आनंद होत आहे. मी या सेटवरही खूप मज्जा करतेय. खूप खूप प्रेम", असे प्रियाने ही पोस्ट शेअर करताना म्हटले आहे. या कार्यक्रमात मैत्री, पालकत्व आणि आधुनिक जीवनातील आव्‍हाने यावर भाष्य केले जाणार आहे. या कार्यक्रमात विनोद, ड्रामा आणि भावनिक क्षणही पाहायला मिळणार आहेत. 'रात जवान है' या कार्यक्रमाचे दिग्दर्शन सुमीत व्‍यास करत आहेत. तर याची निर्मिती यामिनी पिक्‍चर्स प्रायव्‍हेट लि‍मिटेडतर्फे केली जाणार आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

हल्ली पालक झालो की तारूण्‍य संपत असा समज जगातील सर्वांचाच असतो. पण 'रात जवान है' या कार्यक्रमाद्वारे या समजाचे खंडन केले जाणार आहे. या कार्यक्रमात तीन मित्रांची कथा दाखवली जाणार आहे. हे तीन जण मुलं झाल्‍यानंतर देखील त्‍यांच्‍यामधील मैत्री आणि विलक्षणपणा कायम ठेवण्‍यासाठी सर्वोतोपरी प्रयत्‍न करतात. आता यादरम्यान त्यांच्यात कोणकोणत्या अडचणी येतात, त्यांना कोणकोणत्या प्रसंगांना सामोरे जावं लागतं, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. दिग्दर्शक सुमीत व्‍यास हे सध्या या कार्यक्रमाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहेत.