गरोदरपणात बदलली आलियाची चाल.. बेबी बंप सांभाळत रणबीरसोबत पोहचली या ठिकाणी..पाहा व्हिडीओ

यावेळी चालताना आलिया थोडी अवघडलेली दिसून येत होती

Updated: Aug 7, 2022, 01:20 PM IST
गरोदरपणात बदलली आलियाची चाल.. बेबी बंप सांभाळत रणबीरसोबत पोहचली या ठिकाणी..पाहा व्हिडीओ  title=

Pregnant Alia Bhatt Spotted With Ranbir Kapoor: बॉलीवूडची अभिनेत्री आलिया भट सध्या प्रेगनंसी फेज एन्जॉय करताना दिसतेय.सध्या आलियाच्या प्रेगनंसीच्या खूप चर्चा होताहेत. प्रेगनंट असूनही आलिया तिचे शूट्स आणि काम करताना दिसतीये.इतकंच नाही तर प्रमोशनमध्ये ही कुठेच कमी पडत नाहीये.नुकताच डार्लिंग्स  हा तिचा सिनेमा रिलीज झाला त्याच्या प्रमोशनमधून फ्री होते ना होते तोच पती रणबीरसोबत आलिया ब्रम्हास्त्राच्या प्रमोशनसाठी सज्ज झालीये. 
 

आलियाची बदलली चाल

नुकतचं आलिया-रणबीर दोघांना एरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं आहे. त्यांचा एक लेटेस्ट व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय या व्हिडीओमध्ये आलियाचा बेबी बंप स्पष्ट दिसत आहे तर यावेळी चालताना आलिया थोडी अवघडलेली दिसून येत होती गरोदरपणामुळे आलियाची चाल आता बदलली आहे. 

मुंबई एरपोर्टवर स्पॉट केलेल्या या व्हिडिओमध्ये आलिया आणि रणबीर दोघेही कॅज्युअल लूकमध्ये दिसून आले यावेळी आलीया आपला बेबी बंप सांभाळत थोडी सावकाश आणि थोडं वेगळ्या पद्धतीने चालताना दिसून आली ज्याची आता सगळीकडे चर्चा सुरु आहे पण याचवेळी रणबीर मात्र आलियाची काळजी घेताना दिसून आला दोघेही आगामी सिनेमा ब्रम्हास्त्रच्या प्रमोशनसाठी रवाना  झाले.