'तुमच्यासाठी काय पन' च्या मंचावर प्रशांत दामले यांना मिळाली अनोखी भेट !

कलर्स मराठीवरील सध्या गाजत असलेल्या तुमच्यासाठी 'काय पन' कार्यक्रमाला दिग्गज अभिनेते प्रशांत दामले यांनी हजेरी लावली.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Jan 16, 2018, 05:13 PM IST
'तुमच्यासाठी काय पन' च्या मंचावर प्रशांत दामले यांना मिळाली अनोखी भेट ! title=

मुंबई : कलर्स मराठीवरील सध्या गाजत असलेल्या 'तुमच्यासाठी काय पन' कार्यक्रमाला दिग्गज अभिनेते प्रशांत दामले यांनी हजेरी लावली. सध्या त्यांची 'संशय कल्लोळ' आणि 'साखर खाल्लेला माणूस' ही दोन नाटके चांगलीच गाजत आहेत. तसेच कलर्स मराठीवरील 'आज काय स्पेशल' या कार्यक्रमातही ते खूप व्यस्त आहेत.

 'तुमच्यासाठी काय पन'च्या मंच्यावर

तरी देखील वेळात वेळ काढून त्यांनी गाजावाजा जंक्शनवर हजेरी लावली. यावेळेस त्यांनी अनेक किस्से, आठवणी शेअर केल्या. त्यांच्या दमदार अभिनयाने त्यांनी नाट्यसृष्टीत आपला ठसा उमटवला आणि  नाट्यसृष्टीतले विक्रमादित्य अशी ओळख निर्माण केली. तसेच मराठी रसिकांच्या मनात त्यांनी अढळ स्थान निर्माण केले.

चाहत्याने दिली अनोखी भेट

त्यांचे लाखो चाहते आहेत. अनेकजण त्यांना आपले गुरू, आदर्श आणि प्रेरणास्थान मानतात. असाच एक चाहता तुमच्यासाठी काय पनच्या मंचावर आहे. ऋषिकेश विचारे असे या चाहत्याचे नाव असून तो या कार्यक्रमातील आर्ट डिरेक्शनच्या टीम मध्ये काम करतो. प्रशांत दामलेंचा हा मोठा फॅन असून त्याने त्यांच्यासाठी अनोखी भेट तयार केली आहे. त्याने प्रशांत यांचे अप्रतिम स्केच काढून त्यांना भेट दिले. 

सोशल मीडियावर व्यक्त केला आनंद

तो आनंद त्याने सोशल मीडियावर शेअर केला. हे स्केच त्याने स्वतः काढले असून त्यासाठी त्याला तब्बल ७२ तास लागले.