पत्नी नाही तर तिच्यासाठी Prasad Oak नं केलं असं काही..., मंजिरीनंच केला खुलासा

Prasad Oak नं केलेल्या या कृत्याचं सर्वत्र कौतूक होत आहे. दरम्यान, प्रसादनं नक्की असं काय केलं आहे? असा प्रश्न असेल तर मंजिरीनं शेअर केलेला व्हिडीओ नक्कीच पाहा! मंजिरीनं हा व्हिडीओ शेअर करत सगळ्या गोष्टीविषयी डिटेलमध्ये सांगितले आहे. मंजिरीनं शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Updated: Mar 11, 2023, 12:50 PM IST
पत्नी नाही तर तिच्यासाठी Prasad Oak नं केलं असं काही..., मंजिरीनंच केला खुलासा title=

Prasad Oak Viral Video : मराठमोळा अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. प्रसाद हा फक्त अभिनेता नाही तर लेखक, दिग्दर्शक आणि त्यासोबतच निर्माता देखील आहे. प्रसादनं खूप कष्ट करत चित्रपटसृष्टीत त्याची जागा मिळवली. गेल्या वर्षी प्रसाद ओक त्याच्या चंद्रमुखी आणि धर्मवीर या चित्रपटामुळे चर्चेत आला होता. आता प्रसाद ओक एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. प्रसादची पत्नी मंजिरीनं (Prasad Oak Wife And Actress Manjiri) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिच्यासाठी नाही तर एका खास व्यक्तीसाठी रेल्वेची संपुर्ण एक बोगी बूक केली होती, याचा खुलासा केला.

मंजिरीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये मंजिरीनं एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत मंजिरी, प्रसाद, त्यांचा मुलगा मयांक आणि श्वान मस्कारा दिसत आहे. त्या दोघींचा प्रसादसोबतचा ट्रेन प्रवास पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ शेअर करत मंजिरी म्हणाली की मस्काराला घेउन कुठे तरी ट्रिप करायची होती. पण कुठे? या विचारात एक महिना खर्च केला. सगळे ऑप्शन्स ट्राय केले पण आपल्या देशात पेट बरोबरचे प्रवास (स्पेशली एयर ट्रॅव्हल ) का सोइचे नाहीत? असो हा वेगळा विषय आहे... म्हणून मग आम्ही जिकडे सगळ्यांचे प्लान कॅन्सल होतात तिकडे म्हणजे गोव्याला जायचं ठरवलं. पण नुसतं ठरवून काय उपयोग? जायचं कसं हा प्रश्न होताच पण ते सगळं सूखकर करायला सगळ्यात मदत झाली ती म्हणजे आपल्या कोकण रेल्वेची."

हेही वाचा : बहिणीला रॅम्प वॉक करताना पाहून Arjun Kapoor नं केलं असं काही... होतेय एकच चर्चा

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुढे मंजिरी म्हणाली की, "काही पेपर्सची फॉर्मॅलिटी पूर्ण करून दादरवरून रात्री कोकण एक्सप्रेसनं आम्ही निघालो. अशा प्रवासाचा अनुभव नव्हता म्हणून अक्खा कूपे बुक केला आणि मस्काराला पुर्णपणे तिच्या मनासारखी ट्रिप एन्जॉय करू दिली. तीनी अक्षरशः जीवाचा गोवा केला आणि तिच्यामुळे आम्ही सुद्धा खूप वर्षांनी ट्रेनचा प्रवास एन्जॉय केला. कमाल एक्सपीरियन्स होता. सार्थक दादा तुला मिस केलं. मग पहाटे मडगावला उतरुन टॅक्सी केली आणि थेट नॉर्थ गोवा गाठलं. तिकडे जायच्या आधीच आम्ही पेटफ्रेंडली हॉटेल बुक केलं होतं. त्यांचाच प्रायव्हेट बीच होता. त्यामुळे मस्काराला मनसोक्त मज्जा करता आली आणि पर्यायानी आम्हाला पण मस्काराच्या ट्रेनरनं आम्हाला सांगितलं होतं की वर्षातुन चार ट्रिप्स तुम्ही प्लान करत असाल तर त्यातली एक तरी तिच्या बरोबर करा, म्हणून अनेक गोष्टी शिकत शिकत हे सगळं धाडस केलं. अर्थात बरोबर मयंक दादा होता म्हणून मस्कारा पण शहाण्यासारखी वागत होती. ही माहिती मला शेयर करायला जरा लेट झालं पण आमच्यासाठी हा एक नवीन एक्सपीरियन्स होता म्हणून मला हे शेयर कारायचंच होतं." मंजिरीनं शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी प्रसाद आणि मंजिरीची स्तुती केली आहे.