महानायक अमिताभ बच्‍चन यांच्यापेक्षा जास्त फी घ्यायचे प्राण, 'या' १० सिनेमांनी बनवलं स्टार

 प्राण त्यांच्या या १० लोकप्रिय चित्रपटांकरिता ओळखले जातात ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घातली.

Updated: Apr 21, 2021, 03:04 PM IST
महानायक अमिताभ बच्‍चन यांच्यापेक्षा जास्त फी घ्यायचे प्राण, 'या' १० सिनेमांनी बनवलं स्टार title=

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते प्राण यांचा अभिनय आणि त्याच्या खास अंदाजात बोलण्याची कला यामुळे त्यांना फिल्मी जगतात खूप प्रसिद्धी मिळाली. ५० वर्षे सिनेसृष्टीवर राज्य करणारे प्राण हे आपल्या काळातील सर्वात महागडे खलनायक मानले जात असत. डॉन सिनेमासाठी प्राण यांनी अमिताभ बच्चन यांच्यापेक्षाही अधिक पैसे घेतले होते. प्राण यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक चित्रपट हिट केले. प्राण त्यांच्या लोकप्रिय १० चित्रपटांकरिता ओळखले जातात ज्यांनी प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घातली.

फोटोग्राफीच्या आवडीने बनले अभिनेता
प्राण कृष्ण सिकंद यांचा जन्म १२ फेब्रुवारी 1920 रोजी दिल्लीच्या बल्लीमारन भागात इंजीनियर लाला केवळ कृष्णा सिंकद यांच्या घरी झाला. श्रीमंत कुटुंबात जन्मलेल्या प्राण यांना फोटोग्राफीची आवड होती. या छंदानेच त्यांना अभिनयाच्या जगात आणलं.1940च्या दशकात 'यमला जट' या पंजाबी चित्रपटात प्राण यांना पहिली भूमिका मिळाली. त्यांच्या फिल्मी करिअरची सुरुवात इथूनच झाली

नूरजहांसोबत रोमँटिक चित्रपटातून पदार्पण
50च्या दशकातील प्रसिद्ध चित्रपट निर्माते दलसुख पंचोली यांनी प्राण यांना सिनेमात संधी दिली. १९४२ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'खानदान' या हिंदी सिनेमांत प्राण यांना त्यावेळच्या प्रसिद्ध अभिनेत्री नूरजहा यांच्या अपोजिट काम करण्याची संधी दिली. हा चित्रपट अपेक्षेपेक्षा अधिक यशस्वी झाला. प्राण यांचा हा पहिला हिंदी चित्रपट होता. यापूर्वी त्यांनी तीन पंजाबी चित्रपटात छोट्या भूमिका साकरल्या होत्या.

स्वातंत्र्यापूर्वी केले होते 22 चित्रपट  
प्राण यांनी स्वातंत्र्यापूर्वी 22 चित्रपट केले होते. त्यांचे 4 चित्रपट स्वातंत्र्यापूर्वी आणि 18 चित्रपट भारत स्वतंत्र झाल्यानंतर प्रदर्शित झाले. प्राण यांनी आपल्या कारकिर्दीतील 350 हून अधिक चित्रपटांमध्ये यशस्वी कामगिरी केली आहे. 1978 मध्ये रिलीज झालेल्या डॉन चित्रपटासाठी प्राण यांनी अमिताभ बच्चनपेक्षा अधिक फी घेतली होती. एका वृत्तानुसार अभिताभ यांना फी म्हणून अडीच लाख रुपये आणि प्राण यांना पाच लाख रुपये मिळाले

50वर्षे चित्रपटांवर राज्य केलं
सिनेमाजगत अतुलनीय कामगिरीबद्दल प्राण यांना दादासाहेब फाळके पुरस्कार, फिल्म फेअर बरोबर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. 2001 मध्ये त्यांना भारत सरकारने सर्वोच्च नागरिक सन्मान पद्मभूषणनेही सन्मानित केले होतं. ५० वर्षे चित्रपटसृष्टीवर राज्य करणारे अभिनेता प्राण यांनी 12 जुलै 2013 रोजी वयाच्या ९३व्या वर्षी या जगाला निरोप दिला.

प्राण यांचे हायऐस्‍ट रेटेड १० सिनेमा
'खानदान' -(1942) 5.9/10 IMDb रेटिंग
'हलाकू' - (1956) 6.8/10 IMDb रेटिंग
'उपकार' - (1967) 7.6/10 IMDb रेटिंग
'आंसू बन गए फूल'- (1969) /10 IMDb रेटिंग
'धर्मा'- (1973) 7/10 IMDb रेटिंग
'विक्‍टोरिया नंबर २०३' 7.1/10 IMDb रेटिंग
'बे-ईमान' (1972) 6.9/10 IMDb रेटिंग
'जंगल में मंगल' (1972) 6.7/10 IMDb रेटिंग
'चोरी मेरा काम'  (1975) 7.1/10 IMDb रेटिंग
'डॉन' 1978 7.8/10 IMDb रेटिंग
'चोरी मेरा काम'  (1975) 7.1/10 IMDb रेटिंग
'डॉन' 1978 7.8/10 IMDb रेटिंग