'अंघोळ करताना..., प्राजक्ता माळीनं सांगितले दागिने घालण्याचे महत्त्व

Prajakta Mali Jwellery Brand: प्राजक्ता माळी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असून ती नेहमीच सोशल मीयावर चर्चेचाविषयी ठरते. नुकताच तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून या व्हिडीओत प्राजक्ता माळी ही त्यावेळी दागिने का घालावे त्याचे नक्की फायदे का आहेत त्याविषयी सांगितना दिसत आहे. 

दिक्षा पाटील | Updated: May 15, 2023, 07:20 PM IST
'अंघोळ करताना..., प्राजक्ता माळीनं सांगितले दागिने घालण्याचे महत्त्व  title=
(Photo Credit : Social Media)

Prajakta Mali Viral Video: लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीही चांगलीच चर्चेत असते. प्राजक्ता माळी सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत प्राजक्ता तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहते. प्राजक्ता फक्त एक अभिनेत्री नाही तर त्यासोबत एक बिझनेस वूमन देखील आहे. प्राजक्ता माळीनं काही दिवसांपूर्वी तिची दागिन्यांची एक वेब साईट सुरु केली होती. तेव्हा पासून प्राजक्ता तिला कोणत्याही कार्यक्रमात जाण्याची संधी मिळाली की तिचे दागिने परिधान करताना दिसते. आता प्राजक्तानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत दागिने घालण्याचे महत्त्व सांगितले आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

प्राजक्ता या मुलाखतीत दागिने घालण्याचे महत्त्व सांगत होती. यावेळी सोन्याचे दागिने आणि पैंजन घालण्या मागची कारण देखील प्राजक्तानं सांगितले आहेत. प्राजक्ताचा हा व्हिडीओ प्राजक्ता माळी मीम्सनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओत प्राजक्तानं हिरव्या रंगाचा ड्रेस आणि गुलाबी रंगाची ओढणी परिधान केली आहे. तिचा या ड्रेसमधील लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या व्हिडीओत प्राजक्ता म्हणते की 'प्रत्येकाच्या गळ्यात एखादा सोन्याचा अलंकार असावा. अंघोळ करताना त्याचं पाणी अंगावरुन झिरपावं, ते चांगलं असतं. पायात पैंजण किंवा साखळी असावी. तुमच्या शरीराचं तापमान, मासिक पाळीच्या काळात होणारा त्रास या सगळ्यांना नियंत्रित करण्यास मदत होते.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

प्राजक्ता माळी ही नेहमीच तिच्या कामामुळे चर्चेत असते. प्राजक्ता सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी शोमध्ये सुत्रसंचालन करत प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. तिचे शोमधील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. काही दिवसांपूर्वी प्राजक्ता एका सीरिजमध्ये झळकली होती. या सीरिजचं नाव रानबाजार असे होते. तर लवकरच प्राजक्ता माळी एका चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात प्राजक्ता माळीची भूमिका काय असणार आहे हे अजून समोर आलेलं नाही. तर त्याशिवाय चित्रपटाचं नाव देखील अजून सांगितलं नाही. 

हेही वाचा : रॅसमेंटचे सीन शूट करताना अभिनेत्रींची कशी असते परिस्थिती; Archana Puran Singh चा खुलासा

प्राजक्ता माळीच्या ब्रॅंडविषयी बोलायचे झाले तर तिच्या ब्रँडचे नाव ‘प्राजक्तराज’ आहे. यंदाच्या वर्षी जानेवारी महिन्यात प्राजक्तानं तिच्या या ब्रँडला लॉन्च केले. तिच्या या ब्रँडचं उद्घाटन प्राजक्तानं मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते केले. तिच्या या वेब साईटवर वेगवेगळ्या प्रकारचे दागिने आहेत. तिनं काही दिवसांपूर्वी एक दागिण्यांचा नवीन सेटही काढला आहे. दरम्यान, तिच्या या दागिन्यांच्या कलेक्शनमध्ये सोनसळा (इमिटेशन दागिने), म्हाळसा (चांदीचे दागिने) आणि तुळजा (सोन्याचे दागिने) अशा श्रेणीतील दागिने आहेत.