बियॉन्सेच्या बीट्सवर थिरकणार 'बाहुबली'

 या सिनेमाने संपूर्ण जगातील लोकांच मन जिंकल आहे. एवढंच नव्हे तर बॉक्स ऑफिस इंडियावर नवे रेकॉर्ड रचले आहेत.

Updated: Jan 19, 2019, 01:20 PM IST
बियॉन्सेच्या बीट्सवर थिरकणार 'बाहुबली' title=

मुंबई :  प्रभास आपल्या बम्पर ब्लॉकबस्टर 'बाहुबली'च्या प्रदर्शनानंकर सुपरस्टार्सच्या यादीत सहभागी झाला आहे. या सिनेमाने संपूर्ण जगातील लोकांच मन जिंकल आहे. एवढंच नव्हे तर बॉक्स ऑफिस इंडियावर नवे रेकॉर्ड रचले आहेत. आता चाहते प्रभासचा आगामी सिनेमा 'साहो'ची आतुरतेने वाट पाहत आहेत. यासंदर्भात आता एक महत्वाची बातमी आहे. प्रभासचा हा अगदी मोस्ट अवेटेड सिनेमा आहे. हा सिनेमा स्टार कास्टमुळे आणि सेट्समुळे कायमच चर्चेत राहिलेला आहे. पण आता जी माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत त्यामुळे तुम्हाला आणखी आनंद होणार आहे. 'बाहुबली' सिनेमातून सुपरस्टार ठरलेला प्रभास या सिनेमात इंग्रजी बीट्सवर ठेका धरताना दिसणार आहे. 

बॉलिवूडलाईफने दिलेल्या माहितीनुसार, साहो सिनेमातून प्रेक्षकांच डबल मनोरंजन होणार आहे. तुम्हाला प्रभासचं जबरदस्त ऍक्शन तर पाहायला मिळणारच आहे पण त्यासोबत त्याचा डान्सिंग अवतार देखील पाहायला मिळणार आहे. तसेच प्रभासला नाचवणं ही काही सामान्य गोष्ट नाही. म्हणून प्रभास हॉलिवूड गायक बियॉन्सेच्या गाण्यावर थिरकताना दिसणार आहे. 

या सिनेमात बियॉन्से दिसणार नाही पण प्रभास तिच्याच गाण्यावर ठेका धरणार आहे. 'साहो'करता एक गाणं देखील शूट केलं जाणार आहे. त्याकरता अतिशय रॉयल सेट बनवला जाणार आहे. इथे डान्स करता कार्निवल थीम असून ब्राझीलमधून स्पेशल डान्सर बोलवण्यात आले