25 वर्ष लहान Pooja Hegde ला सलमान खान करतोय डेट? अभिनेत्रीनं स्वत: केला खुलासा, म्हणाली...

Pooja Hegde On Relationship With Salman Khan : पूजा हेगडे ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असून तिच्या आणि सलमानच्या रिलेशनशिपची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. दरम्यान, पूजानं आता अखेर एका मुलाखतीत सत्य सांगितलं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Apr 14, 2023, 11:55 AM IST
25 वर्ष लहान Pooja Hegde ला सलमान खान करतोय डेट? अभिनेत्रीनं स्वत: केला खुलासा, म्हणाली... title=
(Photo Credit : Salman Khan Fan Page Instagram)

Pooja Hegde On Relationship With Salman Khan : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) आणि त्याची सहकलाकार पूजा हेगडेचं (Pooja Hegde) यांच नाव सतत जोडण्यात येत आहे. ते दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा तर अनेक दिवसांपासून सुरु होत्या. त्या दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ पाहिल्यानंतर तर त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आलं होतं. दरम्यान, सलमानसोबतच्या रिलेशनशिपच्या चर्चांवर पूजा हेगडेनं प्रतिक्रिया दिली आहे. 

सलमान आणि पूजा जेव्हापासून 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या चित्रपटात एकत्र काम करत आहे. तेव्हा पासून त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा होत्या. त्यावर पूजा म्हणाली की या सगळ्या अफवा आहेत, असं काही नाही. जितके लोक असतात तितक्या वेगवेगळ्या चर्चा सुरु होतात. आपण सगळ्यांकडे थोडी लक्ष देणार. दरम्यान, पुढे पूजानं खुलासा केला की किसी का भाई किसी की जान हा चित्रपट तिला लॉकडाऊन आधीच मिळाला होता. सलमान खाननं तर सात वर्षांपूर्वीच सांगितलं होतं की आपण लवकरच एकत्र काम करू. याचा खुलासा पूजान ई-टाईम्सनं दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सलमान आणि तिच्या रिलेशनशिपच्या चर्चांवर पूजा म्हणाली, 'मी यावर काय करू. मी स्वत: माझ्याविषयी असलेल्या या सगळ्या चर्चा वाचल्या आहेत. पण असं काही नाही. मी सिंगल आहे. माझं स्वत: वर प्रेम आहे. सध्या मी करिअरकडे लक्ष देत आहे. मला सतत काम करायचं आहे. अशा अफवांवर मला काही बोलायचं नाही. कारण याला काही अर्थ नाही.'  

हेही वाचा : तुझा नवरा नेमकं काय काम करतो? वनिता खरातने पहिल्यांदाच केला खुलासा, म्हणाली 'तो DMart मध्ये...'

सलमाननं 7 वर्षांपूर्वी दिलेल्या ऑफरविषयी पूजा म्हणाली, '2016 साली प्रदर्शित झालेल्या  'मोहनजोदडो' या चित्रपटातील माझा अभिनय पाहिल्यानंतर सलमान सरांनी मला सांगितलं होतं की लवकरच एकत्र काम करू. जेव्हा मला या चित्रपटाची ऑफर मिळाली होती तेव्हा मी लगेच होकार दिला. चित्रपटात मी जी भूमिका साकारत आहे. ती माझ्या पर्सनॅलिटीला दाखवते. चित्रपटात मी एका तेलगू मुलीची भूमिका साकारत आहे. चित्रपटातील ती भूमिका साकारण माझ्यासाठी थोडं सोप होतं.' 

'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट ईदच्या निमित्तानं 21 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सलमान आणि पूजा हेगडेशिवाय शहनाज गिल, पलक तिवारी, भूमिका चावला, दाक्षिणात्य सुपरस्टार वेकेंटश दग्गुबाती, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल आणि राघव जुयाल महत्त्वाच्या भूमिकेत आहे.