ट्रान्सपरंट कपड्यांत अभिनेत्री पूजा हेगडेचा बोल्ड अंदाज पाहून चाहते घायाळ

साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्री पूजा हेगडेचं नाव सध्या सर्वत्र चर्चेत आहे. 

Updated: Jul 12, 2022, 07:15 PM IST
ट्रान्सपरंट कपड्यांत अभिनेत्री पूजा हेगडेचा बोल्ड अंदाज पाहून चाहते घायाळ title=

मुंबई : साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्री पूजा हेगडेचं नाव सध्या सर्वत्र चर्चेत आहे. आज ती तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने लाखो हृदयांवर राज्य करत आहे. अभिनेत्री पूजा हेगडेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अलीकडेच, अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून काही फोटो शेअर केले आहेत, जे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

या फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की पूजा हेगडेने पांढऱ्या रंगाचा ट्रान्सपरंट हॉट ड्रेस घातला आहे. ज्यामध्ये ती धुमाकूळ घालत आहे. लूकबद्दल बोलायचं झालं तर, अभिनेत्रीने तिचे केस ओपन ठेवले आहेत आणि सोनेरी कानातले घातले आहेत आणि ती पावसाची मजा घेत आहे. एवढंच नाही तर ती हवामानाचा आनंद घेत आहे. पूजा हेगडेचा हा हॉट लूक पाहून चाहते घायाळ होत असल्याचं दिसत आहे.  तिच्या या लूकचं कौतुक करताना थकत नाहीयेत.

कमेंट सेक्शनमध्ये तिला कोणी सेक्सी म्हणत आहेत तर कोणी तिला हॉट म्हणत आहेत. पूजा हेगडे लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. पूजा हेगडे सलमान खानच्या 'कभी ईद कभी दिवाळी' या चित्रपटात दिसणार आहे ज्यासाठी तिने मोठी रक्कम घेतली  आहे. या चित्रपटात पूजा आणि सलमान खानला पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

त्याचबरोबर, तो 'जन गण मन' मध्ये विजय देवरकोंडासोबत दिसणार आहे जो एक पॅन इंडिया चित्रपट आहे. जो हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नडमध्ये प्रदर्शित होणार आहे. याआधी पूजा हेगडे 'बीस्ट' या चित्रपटात थलपथी विजयसोबत दिसली होती. पूजा हेगडेने नुकतीच कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये रेड कार्पेटवर हजेरी लावली होती. ज्यामध्ये तिने तिच्या सौंदर्याची झलक दाखवली होती.