मुंबई : या जमान्यात काहीच लपवता येत नाही. मात्र महिमा चौधरीने आई-वडिलांपासून एक मोठी गोष्ट लपवून ठेवली होती. पण सोशल मीडियामुळे क्षणार्धात सर्व काही समोर येतं. असंच काहीसं या अभिनेत्रीसोबत घडलं आहे. महिमाने आपला कर्करोग तिच्या आई-वडिलांपासून लपवून ठेवला. महिमानेही या आजारावर दोन वर्षांहून अधिक काळ उपचार घेतले आणि कठोर संघर्षानंतर ती केवळ बरी झाली नाही तर आता चित्रपटांमध्ये पुनरागमन करत आहे.
सहकलाकार अनुपम खेर यांनी तिच्या आजारपणाबद्दल आणि बरं होण्याबद्दल ट्विट केलं तेव्हा महिमाच्या पालकांना कळलं की, त्यांच्या मुलीला कर्करोग झाला आहे. खुद्द महिमाने हे गुपित उघड केलं आहे.
मुलीने खूप काळजी घेतली
महिमाने सांगितलं की, तिच्या आजारपणात तिची १४ वर्षांची मुलगी आर्यनाने तिला खूप साथ दिली आणि रात्रंदिवस तिची काळजी घेतली. महिमाच्या म्हणण्यानुसार, रुटीन चेक-अप दरम्यान, तिच्या डॉक्टरांना स्तनाच्या कर्करोगाचा संशय आला आणि नंतर तिने तज्ञांना दाखवून तिची तपासणी केली. महिमावर दीड वर्ष उपचार सुरू होते. यादरम्यान तिच्या डोक्यावरचे केसही गेले होते.
तिने सांगितलं की, माझ्या मुलीने मला अशी अवस्था पाहून नाराज होऊ नये, म्हणून मी तिला माझ्या बहिणीकडे पाठवलं होतं, पण ती परत आली आणि तिने माझी खूप काळजी घेतली. महिमाच्या कॅन्सरच्या आजाराची कोणालाच माहिती नव्हती. पण जेव्हा अनुपम खेर यांनी या आजाराशी लढतानाचा व्हिडिओ जारी केला तेव्हा महिमाच्या आई-वडिलांना आणि फिल्म इंडस्ट्रीतील लोकांना ही बातमी मिळाली.
महिमा चौधरी निर्माते के.सी. बोकाडिया यांच्या 'द सिग्नेचर' चित्रपटाद्वारे पुनरागमन करत आहे. नुकतंच तिने या चित्रपटाचं शूटिंग पुर्ण केलं आहे. या चित्रपटात अनुपम खेर यांच्याही भूमिका आहेत. महिमाचा हा चित्रपट कॅन्सरग्रस्त रुग्णाचा संघर्ष दाखवतो. कॅन्सर पीडितेसोबत कुटुंबातील सदस्य, डॉक्टर, परिचारिका आणि काळजीवाहू सर्वजण कसे दडपणाखाली असतात हे या चित्रपटात सांगण्यात आलं आहे.
'द सिग्नेचर' या सर्वांचं संकट आणि संघर्ष समोर आणतं. महिमा या चित्रपटात कॅन्सरग्रस्त महिलेची भूमिका साकारत आहे. यात ती कॅन्सरशी झुंज देणारी पेशंट बनली आहे. पण ती कॅन्सरला तिच्या कॅरेक्टरमध्ये विल पॉवरने हरवताना दिसत आहे.