लोकप्रिय टीव्ही अभिनेत्रीच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन

अभिनेत्री आई झाल्याची बातमी कळताचं चाहत्यांकडून कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे.   

Updated: Mar 12, 2022, 03:59 PM IST
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्रीच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन title=

मुंबई : टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा बॅनर्जी आई झाली आहे. पूजाने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. पूजाच्या चाहत्यांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. पूजा आणि पती संदीप सेजवाळच्या घरी एका परीचं आगमन झालं आहे. सध्या तिच्या घरी नव्या पाहुण्याच्या स्वागताची तयारी सुरू आहे. शनिवारी सकाळी पूजाने मुलीला जन्म दिला.

मिळालेल्या माहितीनुसार, पूजाचा भाऊ नील बॅनर्जीने सांगितलं की, 'आम्ही सध्या नागपूरमध्ये आहोत... पूजासोबत तिचा पती आणि आजी आहे... आम्ही बाळ कधी घरी येणार याचं प्रतीक्षेत आहोत.' एवढंच नाही तर आम्ही सध्या सेलिब्रिशनच्या मूडमध्ये आहोत आसं देखील त्याने सांगितलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

'कसौटी जिंदगी की 2' आणि 'कुमकुम भाग्य' या टीव्ही मालिकांमध्ये काम केलेली अभिनेत्री पूजा बॅनर्जी... अभिनय क्षेत्रात अग्रेसर असलेल्या पूजाचा आता नवा प्रवास सुरू झाला आहे. 

पूजा आई झाल्याची बातमी कळताचं चाहत्यांकडून कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. पूजाचे प्रेग्नेंसी दरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. आता चाहते पूजाच्या बाळाची पहिली झलक पाहाण्यासाठी उत्सुक आहेत.