छोटा पडदा गाजवल्यानंतर 'अनन्या' सिनेमाद्वारे अभिनेत्रीचं सिनेमात पदार्पण

'अनन्या' आता रुपेरी पडद्यावर!

Updated: Jan 3, 2020, 10:36 AM IST
छोटा पडदा गाजवल्यानंतर 'अनन्या' सिनेमाद्वारे अभिनेत्रीचं सिनेमात पदार्पण  title=

मुंबई : 'शक्य आहे, तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे' अशी प्रेरणादायी टॅगलाइन घेऊन 'अनन्या' आता रुपेरी पडद्यावर येत आहे. प्रताप फड लिखित आणि दिग्दर्शित "अनन्या" हा चित्रपट नव्या वर्षांत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं टीजर पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं.

ड्रीमविव्हर एंटरटेन्मेंट आणि रवी जाधव फिल्म्सच्या ध्रुव दास आणि प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक रवी जाधव यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर स्वरूप स्टुडिओजचे आकाश पेंढारकर, सचिन 
नारकर आणि विकास पवार हे या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. मराठी रंगभूमीवर प्रेक्षकांची भरभरून दाद मिळवल्यानंतर अनन्या ही प्रेरणादायी कथा आता रुपेरी पडद्यावर येण्यासाठी सज्ज आहे. त्यामुळे या चित्रपटाकडे लक्ष लागले आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

या नव्या दशकाच्या शुभेच्छांबरोबर 'अनन्या' देणार अशक्य ते शक्य करण्याचा एक नवा आत्मविश्वास!!! कारण... "शक्य आहे. तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे!" #ShakyaAahe #itspossible #BePositive #ananyathemovie #marathimovie @ananyathefilm @ravijadhavofficial @meghana_jadhav @pratapphad @aakashpendharkar #blessed #gratitude #positivevibesonly #myfirstfilm

A post shared by Hruta (@hruta12) on

चित्रपटाचं टीजर पोस्टर अतिशय लक्षवेधी आणि सूचक आहे. मोकळ्या आणि अथांग आकाशाकडे पाहात पक्षाप्रमाणे झेप घेऊ पाहाणारी तरुणी या पोस्टरवर दिसत आहे. त्यामुळे स्त्री केंद्रित, प्रेरणादायी आणि आशयसंपन्न कथानक या चित्रपटातून मांडलं जाणार असल्यानं हा चित्रपट नक्कीच महत्त्वाचा ठरेल यात शंका नाही.

'अनन्या' या नाटकात ऋतुजा बागवेने मुख्य भूमिका साकारली होती. नाटकातील तिच्या भूमिकेतील रसिकांनी भरभरून पसंती दिली होती. ऋतुजा बागवेने यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट देखील केली आहे.  यामध्ये तिने 'अनन्या' बद्दलची आपली भावना व्यक्त केली आहे. एवढंच नव्हे तर तिने हृताला सिनेमाकरता शुभेच्छा देखील दिल्या आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

अनन्या  आज खुप संमिश्र भावना आहेत. कारण अनन्या हया नावाशी व पात्राशी मी गेले अडिच वर्ष जोडले गेलेले आहे. ज्या नाटकाचे मी अनन्या म्हणून २८५ प्रयोग क़ेले. त्या नाटकावर मराठी cinema येतोय. नाटकातिल कलाकार सिनेमात नाहित. हा पूर्णतहा व्यावसायिक निर्णय आहे आणि त्याचा मला आदर आहे आणि क़ायम राहिल. पण दोन महिन्यापूर्वी जेव्हा मला सांगण्यात आलं की अनन्या ही व्यक्तिरेखा आता दूसरी अभिनेत्री करणार मला खुप वाईट वाटलं. तो प्रयोग मी माझ्यातल्या अनन्या ला घट्ट मीठी मारुन केला. “कोणताही कलाकार कलाकृति पेक्षा मोठा नसतो.” हे डोक़यात पक्क आहे त्यामुळे “अनन्या” सारख़ी प्रेरित करणारी कलाकृति जास्तित जास्त लोकांन पर्यंत पोहोचायला हवी मग मी त्याचा भाग आसो वा नसो. अनन्या मराठी सीनेमाच्या संपूर्ण team ला अनन्या नाटकाच्या team कड़ून खुप खुप शुभेच्छा  @hruta12 अनन्या ने मला खुप काही दिलय. तुला ही तीने भरभरुन देवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना. @pratapphad @ravijadhavofficial @samir_saptiskar @amolbhor52

A post shared by Rutuja Bagwe (@rutuja_bagwe) on

मात्र सिनेमासाठी अनन्याची भूमिका साकारण्यासाठी अभिनेत्री हृता दुर्गुळेची निवड करण्यात आली. छोट्या पडद्यावर 'फुलपाखरू' मालिकेतील प्रेक्षकांच मन जिंकल्यानंतर आता हृता दुर्गुळे आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.