मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी याचा मोठा मुलगा आकाश अंबानी लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सध्या रंगल्या आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार आकाश अंबानीचे लग्न हिरे व्यापारी रसेल मेहता यांची धाकटी मुलगी श्लोका हिच्याशी होणार असल्याचे बोलले जातेय.
न्यूज एजन्सी पीटीआयच्या माहितीनुसार, आकाश अथवा श्लोकाच्या कुटुंबियांनी अद्याप याबाबत कोणतेही विधान कऱण्यास नकार दिलाय. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांच्या साखरपुड्याची घोषणा पुढच्या काही आठवड्यांमध्ये होऊ शकते. तर लग्न डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे.
अंबानी आणि मेहता कुटुंबिय एकमेकांच्या चांगल्या परिचयाचे आहेत. आकाश आणि श्लोका धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये एकत्र शिकलेत.
कुटुंबातील जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आकाशच्या लग्नाची अथवा साखरपुड्याची तारीख फिक्स झालेली नाही.